पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार

पुण्यातील चांदणी चौकातील पूल रात्री इतक्या वाजता पाडला जाणार

Updated: Sep 27, 2022, 11:34 PM IST
पुणेकरांची चिंता कायमची मिटणार, चांदणी चौकातील पुल या दिवशी रात्री पाडला जाणार title=

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या मुहूर्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Pune Chandni Chowk Bridge will be demolished) हा पूल 1 ऑक्टोंबरला रात्री 2 वाजता पाडायला सुरूवात होणार आहे. रात्री 2 वाजता विस्फोट करून पूल पाडला जाणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. (Pune Chandni Chowk Bridge will be demolished on this day night Pune News)

वाहतूक राहणार बंद 
पूल पाडत असताना 200 मीटर परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. तिथला सर्वे केला असून जवळपास ज्या इमारती आहेत त्यांना नोटीस उद्या पाठवल्या जाणार आहेत. पोलिसांकडून ब्लास्टिंगची परवानगी घेतली असल्याचं राजेश देशमुख यांनी सांगितलं. 600 किलो स्फोटके यासाठी वापरली जाणार आहेत. 
 
1 ऑक्टोबरला रात्री एक वाजता पासून 2 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. पूल पाडल्यानंतर राडारोडा काढण्याचं काम होणार आहे. त्यामुळे साताराहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण दलाचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे येणं प्रवाशांनी टाळावं असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलंय. मुंबईतीलट ट्विन टॉवर पाडण्यासाठी जी टीम होती त्याच टीमकडे हे काम सोपवण्यात आलं आहे.