काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

Updated: Oct 4, 2019, 03:32 PM IST
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल title=
संग्रहित फोटो

सांगली : प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजित कदम यांनी पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ शक्तीप्रदर्शन, रॅली आणि मेळावा घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. 

विरोधकांना अगोदरच जनतेचा कौल कळला, म्हणूनच त्यांनी मैदानातून पळ काढला अशी टीका आमदार विश्वजित कदम यांनी केली. आमदार विश्वजित कदम यांनी परंपरागत प्रतिस्पर्धी भाजपा नेते संग्राम देशमुख यांना टोला लगावला. पलूस कडेगाव मतदारसंघ शेवटच्या क्षणी शिवसेनेला मिळाला, तोच मुददा धरून कदम यांनी ही टीका केली.

आमदार विश्वजित कदम भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र्रात अनपेक्षित निकाल लागतील, असे म्हणत त्यांनी, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष आघाडीला यश येईल असा विश्वास व्यक्त केला.