नागपूर : जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे. इथे काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना आहे. काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ हा निमशहरी आणि ग्रामीण अशा भागांमध्ये विभागला आहे. या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादीने परत एकदा अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील ग्रामीण भागावर देशमुखांची भिस्त आहे.
२०१४ मध्ये काटोल नरखेडमधून निवडून आलेले भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी २०१८ मध्ये आमदारकी आणि भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपने काटोल नरखेडचे नगराध्यक्ष चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारासाठी विकास याच मुद्द्यावर ठाकूर यांनी भर दिला आहे.
भाजप काटोल नरखेडचा गड राखणार का की राष्ट्रवादीचे अनिल देशमुख या जागेवर वर्चस्व मिळवणार, हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, नागपूरमध्ये संघाचे कार्यालय आणि भाजपला मागिल निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत ही जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे.