हेमंत चापुडे, झी 24 तास, जुन्नर : महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. त्यामध्ये आता 18 जुलैपासून GST वाढल्याने खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. आता यासोबत आणखी एक झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
वाहनचालकांना महागाईचा फटका बसणार आहे. पुणे ग्रामीण भागात सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे CNG गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडेवाढ करणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
मध्यरात्रीपासून पुणे ग्रामीण मध्ये सीएनजी चे दर दोन रुपयांनी वाढले आहेत. आधी वाढणारी महागाई आणि आता सर्वसामान्य प्रवाशांना आजून एक झटका बसला आहे.
पुणे ग्रामीण मध्ये सीएनजी चे दर हे 85 रुपयांवरून आता 87 रूपयांवर पोहचले आहेत. दोन रूपयांच्या दर वाढीने वाहन चालकांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.