CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या गावी मुक्कामी आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावातच ते तीन दिवस मुक्काम करत आहेत. यावेळी त्यांनी एक्सवर (ट्विटर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते दरे या त्यांच्या मुळगावी दाखल झाले होते. यावेळी गावात असतानाचं त्याचे वेळापत्रक कसे होते. याची एक झलक त्यांनी व्हिडिओतून दाखवली आहे. तसंच, व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गावच बरा असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेचे हे ट्विट म्हणजे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोमणा असल्याची चर्चा रंगली आहे.
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी...
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी...लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला… pic.twitter.com/hD5NY0vYey
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2024
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.