रत्नागिरी : Boyfriend murdered his girlfriend at Jaigad : धक्कादायक बातमी. जयगडमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने तिचा ओढणीने गळा आवळला. प्रियकर समीर प्रकाश पवार ( 23, रा. नांदवडे) याला जयगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चैताली संतोष पांचाळ हिची हत्या केल्याची कबुली जयगड पोलिसांना दिली आहे.
नांदिवडे आंबेवाडी येथील चैताली (19) ही तरुणी एका मेडिकलमध्ये कामाला होती. तिचे समीर पवार याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला आणि खटके उड लागले. तिने त्याच्याशी बोलणे टाकले होते. त्यानंतर समीर वारंवार तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ती त्याकडे दुर्लक्ष करीत होते. या प्रकार लक्षात येतात समीर याच्या मनात चैताली बद्दल प्रचंड राग निर्माण झाला आणि त्याने तिचा काटा काढण्याचा निर्धार केला, अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली.
शनिवार २३ एप्रिल रोजी चैताली नेहमीप्रमाणे सकाळी मेडिकलमध्ये कामासाठी गेली होती. सायंकाली मेडिकल बंद झाल्यानंतर ती घरी परत होती. त्यावेळी तिची वाट वापर समीर त्याठिकाणी होता. त्याने चैताली गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिने त्याच्याशी बोलणे टाळून घरी जाणे पसंत केले. ती पुढे जात असताना अंधाराच फायदा घेत तिचा हात पकडला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी समीरने तिच्याच ओढीने गळा आवळला आणि ती बेशुद्ध पडली.
यामध्ये ती बेशुद्ध पडली. तिची हालचाल थंडावल्याने मृत्यू झाला असा समज समीर याचा झाला. त्यानंतर समीरने चैतालीला रस्त्यानजिकच्या आंब्याच्या बागेत ओढत नेले. तेथे तिच्याच ओढणीने गळफास तयार करुन त्यामध्ये तिला अडकवले आणि तिने आत्महत्या केल्याचे भासवत पुरावा नष्ट करण्याता प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून प्रसार झाला.
आपली मुलगी रात्री झाली घरी कशी आली नाही, म्हणून घरच्यांनी चैतालीचा शोध घेतला. परंतु रात्री चैतालीचा शोध लागला नाही. त्यानंतर रविवारी सकाळी शोध घेत असताना आंब्याच्या बागेत तिचा मृतदेह आढळून आला. आंब्याच्या झाडाला गळफास स्थितीत दिसून आली. त्यावेळी कुटुबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
परंतु घटनास्थळीवरील स्थिती संशयास्पद दिसल्याने तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, असा संशय पोलिसांना आला होता. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासासाठी चैतालीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. गेल्या महिनाभरात तिच्या संपर्कात कोण कोण होते? त्याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर चैत्रालीचा पूर्वीचा प्रियकर समीर पवार याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या समीरला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची माहिती दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चैतालीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर समीर प्रकाश पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने समीर पवारला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कलेकर करीत आहेत.