थरारक...बसने दुचाकीला चिरडले, गरोदर महिलेचा जागीच मृत्यू

Nanded bus - two-wheeler Accident : एक धक्कादायक अपघाताची बातमी. काळजाचा ठोका चुकवणारा थरार..भरधाव बसने बाईकस्वाराला चिरडलं आणि...

Updated: Apr 28, 2022, 01:34 PM IST
थरारक...बसने दुचाकीला चिरडले, गरोदर महिलेचा जागीच मृत्यू  title=

नांदेड : Nanded bus - two-wheeler Accident : एक धक्कादायक अपघाताची बातमी.  एका खासगी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तिला चिरडले. या अपघाचाचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. हा अपघात मंगळवारी घडला होता, यात दुचाकीवरील 22 वर्षीय गरोदर महिला चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. 

नांदेड शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला होता. शिवाजी डांगे हे पती- पत्नी आणि चंद्रकांत मोरे हे तिघे एका दुचाकीवरुन जात होते. पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडताना भरधाव आलेल्या खासगीबसने त्यांना चिरडले. दुचाकीला बसने चिरडल्याची घटना सिसीटीव्हीत कैद झाली. या अपघातात इंदूबाई ही गरोदर महिला चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाली तर दोघे जखमी झालेत.

व्हिडिओ :