कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; कर्ज काढून न दिल्याने रिक्षावाल्याने महिलेला...

ऑटोचालक संजयने संगीता यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाल्या आहेत.

Updated: Nov 5, 2022, 09:40 PM IST
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; कर्ज काढून न दिल्याने रिक्षावाल्याने महिलेला... title=

अमर काणे, झी मिडिया, नागपूर :  महिलांच्या सुरक्षेवर(Crime) प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना नागपूर शहरात घडली आहे. रिक्षा चालकाने(Autorickshaw driver) एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून हा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या (Pachpavali Police Station of Nagpur) हद्दीत येणाऱ्या आवळे चौकात(Awale Chowk) ही घटना घडलेय. रिक्षा चालकाने महिलेवर विळ्याने वार केले.  

संगीत करवडे असे (50 वर्षीय जखमी) जखमी महिलेचं नाव आहे.  संजय जामगडे असे हल्ला करणाऱ्या ऑटोचालकाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून यांच्यात वाद झाले होते.   आवळे चौकात संगीता यांचा छोटासा कॅन्टीनचा व्यवसाय आहे. मारेकर संजय जामगडे आणि संगीता दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. 

कर्ज काढून पैसेच दिले नाहीत

संगीता या बचत गटाचे कर्ज काढून आरोपीला संजयला देणार होत्या. पण त्यांनी कर्ज काढून पैसेच दिले नाही. यावरून संजयचे संगीता यांच्यासह भांडण झाले. हे प्रकरण पाचपावली पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले होते. 

विळ्याने हल्ला केला

याचाच राग मनात धरुन ऑटोचालक संजयने संगीता यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात संगीता गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पाच पावली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.