पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Accident News :कात्रज नवीन बोगद्यादरम्यान जांभूळवाडी दरीपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातच एकाचा जागीच मृत्यू झाला. 

Updated: Jan 27, 2022, 09:46 AM IST
पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू title=

पुणे : Accident News :कात्रज नवीन बोगद्यादरम्यान जांभूळवाडी दरीपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातच एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Accident near Katraj tunnel in Pune, one died on the spot)

कंटेनर आणि कारची एकमेकांना जोरदार धडक झाली. यावेळी बाजूनी जाणाऱ्या दुचाकीलाही जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर घेऊन चालक फरार झाला आहेत. या भीषण अपघातात चारचाकीचा चुराडा झाला आहे. या अपघाताच्यावेळी दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरुन दोघेजण प्रवास करत होते.