नागपुरात दुर्मिळ घटना! दारु पिताना खाल्ल्या Viagra च्या गोळ्या, नंतर जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल

Vigara Causes to Death: नागपुरात दारु पिताना व्हायग्राच्या (Vigara) दोन गोळ्या खाल्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्मिळ घटना असून Journal of Forensic and Legal Medicine ने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्यांचं सेवन करु नये असा सल्ला दिला आहे.   

Updated: Mar 7, 2023, 04:09 PM IST
नागपुरात दुर्मिळ घटना! दारु पिताना खाल्ल्या Viagra च्या गोळ्या, नंतर जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल title=

Vigara Causes to Death: नागपुरात एक दुर्मिळ आणि धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपान करताना व्हायग्राच्या (Vigara) गोळ्या खाल्ल्याने 41 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. Journal of Forensic and Legal Medicine ने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. केस स्टडीमध्ये डॉक्टरांनी मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. दरम्यान, डॉक्टरांनी या गोळ्याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे. 

केस स्टडीमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने Viagra च्या ब्रँडखाली विकल्या जाणाऱ्या sildenafil च्या दोन गोळ्या खाल्ल्या होत्या. यावेळी तो मद्यपानही करत होता. दरम्यान या व्यक्तीला कोणताही वैद्यकीय त्रास नव्हता किंवा सर्जरी झालेली नव्हती. 

दुसऱ्या दिवशी सकाळी या व्यक्तीला त्रास जाणवू लागला. त्याला सतत उलट्या होत होत्या. यानंतर त्याच्या मैत्रिणीने वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला. पण त्याने आपल्याला याआधीही असा त्रास झाला आहे सांगत डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला.  

पण प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे दाखल होताच त्याला मृत घोषित करण्यात आलं. अभ्यासानुसार, सेरेब्रोव्हस्कुलर हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. मेंदूला ऑक्सिजनचा होणारा पुरवठा या स्थितीत कमी होतो. 

अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, "कोणताही मेडिकल किंवा सर्जिकल भूतकाळ नसणारा 41 वर्षीय व्यक्ती हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीसह वास्तव्यास होता. त्याने रात्री मद्यपानासह sildenafil च्या (50 mg each) दोन गोळ्यांचं सेवन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्वस्थ जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.पण दाखल होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं".

शवविच्छेदनात, डॉक्टरांना 300 ग्रॅम गोठलेलं रक्त आढळलं आगे. मद्य आणि औषधाचं मिश्रण केल्याने तसंच आधीच असणारा उच्च रक्तदाब यामुळे त्याचा मृत्यू झाला. अभ्यास प्रसिद्ध कऱणाऱ्या लेखकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन औषधे घेताना असणारे धोके लोकांना कळावेत आणि जागरुकता व्हावी यासाठी हा अभ्यास प्रकाशित केला आहे.