Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास

Merry Christmas 2023 : नाताळच्या शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाचा अर्थ आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Dec 21, 2023, 10:11 AM IST
Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास title=
Why say Merry Christmas instead of Happy Christmas This is because see the meaning and history of the word

Merry Christmas 2023 : जगभरात विविध धर्म, पंथाच्या विविध संस्कृती, परंपरा आनंदाने नांदताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आपण सगळे इंग्रजी कॅलेंडरनुसार चालतो. या कॅलेंडरनुसार आता या वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर आला आहे. या डिसेंबरची लहान मुलांपासून मोठे लोक आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या महिन्यात येतो तो म्हणजे नाताळाचा सण म्हणजेच ख्रिसमस. जगभगरात 25 डिसेंबरला (Christmas 2021) ला ख्रिसमस डे साजरा करण्यात येतो. लहान मुलं ख्रिसमसला सँटा क्लॉजची वाट पाहतात. कारण हा सँटा चिमुकल्यांसाठी गिफ्ट आणतो. खरं तर आता जगभरात ऑफिसमध्ये सीक्रेट सँटा हा खेळ खेळला जातो. ज्यामध्ये तुमचा एक सहकारी तुमचा सँटा असतो आणि तो तुमच्यासाठी छान गिफ्ट आणतो. (Why say Merry Christmas instead of  Happy Christmas This is because see the meaning and history of the word)

दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी न्यू इयर', 'हॅपी होळी' किंवा 'हॅपी दिवाळी' असं म्हणतो, मग ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का बोलतो. याचं कारण तुम्हाला माहित आहे का? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? 

'मेरी' आणि 'हॅपी' शब्दामधील फरक काय?

युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा देताना 'हॅपी ख्रिसमस' म्हटलं जायचं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच देतात. तसंच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' असंच म्हणतात. त्यामुळे हॅपी आणि मेरी या दोन शब्दाचा अर्थ आपण आज जाणून घेऊयात. 

कोणी प्रचलित केला 'मेरी' हा शब्द?

'मेरी' हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका आहे. आजपासून सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात 'मेरी' हा शब्द सर्वाधिक वापरला गेला होता. यानंतर हे पुस्तक जगभर वाचलं गेल. त्यानंतर 'हॅप्पी'च्या जागी 'मेरी' शब्दाची प्रथा सुरू झाली आहे. म्हणून तुम्ही 'मेरी ख्रिसमस' ऐवजी 'हॅपी ख्रिसमस' म्हटलं तर त्यात काही चुकीच होणार नाही.