Nagraj Manjule Baby Boy Names and Meaning: दिग्दर्शक नागराज मंजुळेचा 'नाळ 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुलगा आणि आई यांच्या नात्याला हळूवारपणे स्पर्श करणारा हा सिनेमा 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चैतू आणि चिमू आणि मणी या तीन मुलांच भावविश्व जपणारा हा सिनेमा आहे.
सिनेमातील या तीन मुलांसोबतच नागराज मंजुळेच्या दोन्ही मुलांटी नावे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झी चोवीस तासशी बोलताना नागराज मंजुळेने आपल्या दोन्ही मुलांची नावे सांगितली आहेत. नागराज आपल्या कलाकृतीतून कायमच वेगळेपण दाखवत असतो. अगदी तसंच नागराजच्या मुलांची नावेही अतिशय खास आहेत. आपण यामध्ये नागराजच्या दोन मुलांची आणि दोन पुतण्यांची नावे पाहणार आहोत, जी स्वतः नागराजने ठेवली आहे. यासोबत त्या नावांचे अर्थ देखील समजून घेणार आहोत.
नागराज मंजुळेने दोन्ही मुलांची नावे 'राया' आणि 'शाहू' अशी ठेवली आहेत.
'राया' - 'राया' म्हणजे मैत्री.. हक्काचा माणूस.... नागराज मंजुळेने मोठ्या मुलाला दिलंय हे नाव. शिवाजी महाराजांच्या काळातील हे नाव आपलं वेगळेपण अधोरेखित करतं.
'शाहू' - सर्वोत्तम आणि सर्वात मौल्यवान मोती असा या नावाचा अर्थ होतो. तसेच महाराष्ट्राला समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा परंपरा लाभली आहे. यांची कृतज्ञता म्हणून हे नाव देण्यात आलंय. मुलांसाठी ही दोन वेगळी नावे आहेत.
नागराज मंजुळेने आपल्या भावाच्या मुलींनाही गोड नावे दिली आहेत. एकीचे नाव राही तर दुसरीचे राहत.. या दोन्ही नावांमध्ये एक शांतता आहे. पाहूया याचे अर्थ .
'राही' - 'राही' म्हणजे प्रवासी... जीवनाचा प्रवासात आपण प्रवाशी बनून जगत असतो असा याचा गुयार्थ होतो. तसेच महाराष्ट्राची बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांच्या नावातही राही आहे.
'राहत' - राहत हे देखील उर्दू किंवा हिंदी भाषेतून आलेलं नाव आहे. या नावाचा अर्थ आहे जीवाला शांतता, सुकून.. मुलींसाठी ही अतिशय दोन वेगळी नावे आहेत.
रायबा
गाथा
मैत्रेय
सुकून
यज्ञेश
आर्य
कलम