Health Care: २०२५ मध्‍ये आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा

Health Care: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्‍य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 13, 2025, 04:26 PM IST
Health Care: २०२५ मध्‍ये आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा  title=

Healthy Lifestyle: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्‍य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. अधिक पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करा, प्रक्रिया केलेल्‍या खाद्यपदार्थांचे सेवन कमी करा आणि भरपूर प्रमाणात पाणी प्‍या, जे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी गरजेचे आहे. योग्‍य पोषणाव्‍यतिरिक्‍त स्‍नायूबळ व हाडांची घनता उत्तम राहण्‍यासाठी नियमितपणे व्‍यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोनदा स्‍ट्रेन्‍थ ट्रेनिंग व्‍यायाम केल्‍याने स्‍नायूबळ मजबूत होऊ शकते, संतुलन सुधारू शकते आणि चयापचय आरोग्‍याला मदत होऊ शकते. चालणे, पोहणे किंवा योग यांसारखे क्रियाकलाप देखील एकूण फिटनेस उत्तम राखण्‍यास मदत करतात. याबद्दल अधिक जाणून घेऊयात अ‍ॅबॉटच्‍या मेडिकल अँड सायण्टिफिक अफेअर्स, न्‍यूट्रिशन बिझनेसच्‍या संचालक डॉ. प्रीती ठाकोर यांच्याकडून... 

आपण नववर्ष २०२५ मध्‍ये सुरुवातीलाच   फूड किंवा सप्‍लीमेंट्सच्‍या माध्‍यमातून आहारसंदर्भातील तफावतींना दूर करूया, ज्‍यामुळे उत्‍साही व आरोग्‍यदायी जीवन जगण्‍यास मदत होईल. शरीराला पोषण देणाऱ्या अर्थपूर्ण परिवर्तन करण्‍याच्‍या संधींचा फायदा घ्‍या, सक्रिय राहा आणि सकारात्‍मक मानसिकता ठेवा. या ध्‍येयांशी बांधील राहत आपण एकत्रित आरोग्‍यदायी, उत्‍साही नववर्षासाठी सज्ज राहू शकतो.

दैनंदिन आहाराकडे लक्ष ठेवा 

लोकप्रिय म्‍हण आहे, 'राजासारखे ब्रेकफास्‍ट, राजकुमारासारखे दुपारचे जेवण आणि गरीबासारखे रात्रीचे जेवण सेवन करा.'' कार्बोहायड्रेट्सच्‍या तुलनेत प्रोटीन्‍स व फॅट्स पचायला जड असल्‍यामुळे ते ब्रेकफास्‍ट व दुपारच्‍या जेवणामधून सेवन केले पाहिजेत. चयापचय क्रिया सायंकाळच्‍या वेळी मंदावत असल्‍यामुळे रात्रीचे जेवण कमी प्रमाणात सेवन करावे. आदल्‍या दिवशी उपवास केल्‍यानंतर ब्रेकफास्‍ट, आहार करण्‍यापूर्वी कोमट पाणी प्‍यावे, ज्‍यामुळे शरीरातील टॉक्झिन्‍स उत्‍सर्जित होण्‍यास मदत होईल. पोहा, उपमा, डोसा, इडली किवा डाळींपासून बनवलेले चीला यांसारख्‍या ऊर्जा-संपन्‍न कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा, हंगामी भाज्‍यांचे सेवन करा, सोबत अतिरिक्‍त पोषणासाठी फळे खा किंवा ग्‍लासभर दूध प्‍या. दुपारच्‍या जेवणामध्‍ये मुख्‍य आहारापूर्वी सलाड्स सारख्‍या प्रक्रिया न केलेल्‍या खाद्यपदार्थांचे सेवन करावे, ज्‍यामधून आवश्‍यक व्हिटॅमिन्‍स मिळतील. चपाती-भाजी किंवा खिचडीभात यासारखे संतुलित आहार रात्रीच्‍या वेळी हलका असण्‍यासोबत सहजपणे पचतात.

या मुख्‍य आहारांव्‍यतिरिक्‍त, लहान प्रमाणात पोषण-संपन्‍न स्‍नॅक्‍सचे सेवन जसे ग्‍लासभर एन्‍शुअर पिल्‍याने भूकेचे शमन होऊ शकते आणि दिवसभर ऊर्जा पातळ्या कायम राहू शकतात.