Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात मोठा अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने एसआयटीतील 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम आहेत. मात्र, एसआयटीमधील 8 सदस्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं हे फेरबदल करण्यात आले आहेत. विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते यांची SITमधून गच्छंती करण्यात आली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीवर कुटुंबाने आक्षेप घेतले होते. SIT समितीमधील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचे कुटुंबाचे म्हणणे होते. यानंतर जुन्या एसआयटीतीमधील काही अधिकाऱ्यांची गच्छंती झाली आहे नव्या एसआयटीमध्ये आयजी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या एसआयटी गाठीत करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या एसआयटीमध्ये बसवराज तेली हे प्रमुख आहेत. तर, किरण पाटील डीवायएसपी, अनिल गुजर डीवायएसपी अक्षय ढिकणे, पोलीस निरीक्षक सुभाष मुठे, पोलीस उपनिरीक्षक शर्मिला साळुंखे, पोलीस हवालदार दीपाली पवार पोलीस हवालदार यांचा समावेश आहे.
दरम्यान, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. तपासा बद्दल नाराजी व्यक्त केल्याने कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.