खरंच अघोरी साधू माणसांचे मांस खातात का? स्मशानात साधना करणाऱ्या साधूंचे भयाण वास्तव

Aghori Sadhu : अघोरी साधू खरचं मेलेल्या माणसांचे मांस खातात का? स्माशानात साधना करणाऱ्या साधूंचे धक्कादायक सत्य जाणून घ्या.

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 09:54 PM IST
खरंच अघोरी साधू माणसांचे मांस खातात का? स्मशानात साधना करणाऱ्या साधूंचे भयाण वास्तव title=

Aghori In Mahakumbh : जगातील सर्वात मोठा मेळा अशी ओळख असलेल्या महाकुंभ मेळ्याचा प्रारंभ झाला आहे. प्रयागराजमध्ये आजपासून सुरु झालेला महाकुंभ मेळा  45 दिवस म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत ते अघोरी साधू. यांची जीवनशैली खूपच रहस्यमयी आहे. अघोरी साधू खरचं मेलेल्या माणसांचे मांस खातात का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. जाणून घेऊया स्माशानात साधना करणाऱ्या साधूंचे धक्कादायक सत्य.

महाकुंभासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. येथे येणारे अघोरी साधू सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. अघोरी म्हणजे कापालिक क्रिया करणारे. हे अघोरी साधू स्मशानभूमीत तांत्रिक साधना करतात. यांचे शरीर ही भस्माने माखलेले असते. या साधूंचे हे रुप पाहूनच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. अघोरी साधू मेलेल्या माणसांचे मांस खातात असेही बोलले जाते. यामुळे देखील अघोरी साधू नेहमीच चर्चेत असतात. 

अघोरी साधूंच्या या भयानक साधेनविषयी समजून घेण्याआधी अघोरी शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. अघोरी शब्दाचा अर्थ आहे ज्याला कसलाच घोर नाही. अर्थात ज्याला कसलेच भय आहे. अघोरी साधू हे  स्मशानातच राहतात आणि स्मशानातच साधन करतात.

स्माशानात साधना करणाऱ्या साधूंचे भयाण वास्तव

अघोरी साधू माणसांचे मांस खातात असे बोलले जाते.  अनेक अघोरी साधूंनी विशेष डॉक्यूमेट्रींदरम्यान हे मान्य केले आहे. अर्धवट जळालेल्या प्रेतांचं मांस हे अघोरी साधू खातात.  असं केल्याने तंत्र शक्ती वाढत असल्याचा अघोरी साधूंचा दावा असल्याचे अनेकजण सांगतात. अघोरी साधूंचे आणकी एक वास्तव म्हणजे हे साधू प्रेतांसोबत शरीर संबंध ठेवत असल्याचा दावा केला जातो. ही बाब देखील अघोरी साधू मान्य करतात. हा शिव-शक्तीची उपासना करण्याचा मार्ग असल्याची नागा साधूंची श्रद्धा आहे.