Jain Monks and Nuns Sects in Marathi : भारतात अनेक समाज आनंदाने एकत्र नांदतात. प्रत्येक समाजाचे आपले वैशिष्ट्य आणि प्रथा आहेत. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आजही पाळल्या जातात. भारतात जैन समाज आहे, ज्यात अनेक अशा प्रथा ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. जैन भिक्षुकांच्या आयुष्याबद्दल आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून तुम्हालाही धक्का बसेल. कुटुंबापासून लांब, सर्व सुखसोयींच्या त्याग करुन खूप कठोर तपश्चर्या करुन जैन भिक्षु बनतात. दिगंबर संप्रदायातील भिक्षू शरीरावर एकही कपडे परिधान करत नाहीत. या समाजाच अशी मान्यता आहे, जेव्हा भगवान महावीर ध्यानाद्वारे उंच स्तरावर पोहोचले तेव्हा त्यांना शरीराची जाणीव राहिली नाही. त्यांना कपड्याचंही भान उरलं नव्हतं.
दिगंबरा पंथात वस्त्राचा त्याग हा 'अपरिग्रह' या तत्त्वाचा पराक्रम मानला गेलाय. जैन धर्मानुसार, कपडे हे भौतिक सुख असून कपडे खरेदीसाठी पैसे लागत असतात. तसंच त्या कपड्याची स्वस्छता करण्यासाठी पैसा आणि वेळ या सगळ्या गोष्टी संसारिक जीवनाशी निगडीत मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे जैन भिक्षुक कपड्यांचा त्याग करतात. जैन ऋषी हे सर्व परिग्रहांपासून वंचित असल्यामुळे ते त्यांच्याकडे फक्त मोराच्या पिसांनी बनवलेली पेची वापरतात. जी केवळ गुप्तांग झाकण्यासाठी वापरण्यात येते. काही जैन साधू मोराची पिसे किंवा शेपूटही वापरत करत नाहीत. हा धर्म अहिंसा, अहंता आणि सांसारिक गोष्टींबद्दल पूर्ण त्याग यावर विश्वास ठेवणारा असतो.
एवढंच नाही तर जैन भिक्षू यांची केस कापण्याची प्रक्रियाही देखील कठीण आणि वेदनादायी असल्याच सांगण्यात आलंय. केस लोचनासाठी ही लोक कात्री, वस्तरा, ब्लेड इत्यादी कोणत्याही साधनांचा वापर करत नाहीत. अशात डोक्याचे, दाढी, मिशा आणि शरीराच्या इतर भागांचे केस ते हाताने उपटतात. दिगंबर जैन यांच्या संत आणि आर्यिकांसाठी (स्त्री साध्वी) केश लंचन अनिवार्य मानल गेलंय. जैन भिक्षू आणि आर्यनिकांनी वर्षातून चार वेळा केश लोचन करावं लागतं. या प्रक्रियेत प्रचंड वेदना सहन करावी लागते. कधी कधी केस उपटताना रक्त येतं तरीही ते या कठीण परीक्षेतून माघार घेत नाहीत. तसंच कितीही थंडी असली तरीही ते कपडे परिधान करत नाहीत. त्यामुळे थंडीत रजाई किंवा उबदार कपडे वापरण्याचा प्रश्नच येत नाही. त्याशिवाय बिनाकपड्याचे आणि थंडीतही हे भिक्षु जमिनीवर झोपतात.