लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीमध्ये भयंकर भांडणं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

व्हिडीमध्ये लग्नासाठी स्टेवर उभ्या असलेल्या वधू-वरांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरु झाली, ज्यामुळे हे वाद लग्न तुटण्यापर्यंत पोहोचलं.

Updated: Apr 26, 2022, 05:36 PM IST
लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीमध्ये भयंकर भांडणं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : अनेक लग्नात अशा घटना घडतात, ज्या फारच मजेदार असतात आणि त्या घटना आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहातात. हा दिवस वधू आणि नवरदेवासाठी देखील महत्वाचा दिवस असतो. कारण त्यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असेल. त्यामुळे या दिवशी सगळ्या गोष्टी चांगल्याच व्हाव्यात अशी नववधू आणि नवरदेवाची इच्छा असते. परंतु एका लग्नात काही भलतंच घडलं. ज्यामुळे या लग्नातील व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे.

या व्हिडीमध्ये लग्नासाठी स्टेवर उभ्या असलेल्या वधू-वरांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरु झाली, ज्यामुळे हे वाद लग्न तुटण्यापर्यंत पोहोचलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर स्टेजवर उभे आहेत. त्यावेळी हार घालतानाच्या कार्यक्रमावेळी नववधू ही नवरदेवाला मिठाई भरवत असले. परंतु नवरदेवाचं तिच्याकडे काही लक्ष नसतं. तो दुसरीकडेच पाहात असतो.

त्यावेळी नववधु पुन्हा मिठाई भरवण्यासाठी हात पुढे करते. परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण नवरदेव तरी देखील नववधूकडे पाहात नाही. अशावेळी रागावलेली नववधू नवरदेवाला जोरदार कानशिलात मारते.

सर्वांसमोर आपला अपमान झालेला पाहून नवरदेव देखील नववधूच्या कानशिलात मारतो. ज्यानंतर या दोघांमध्ये जवळ-जवळ मारामारीच सुरु होतो. कारण ते दोघेही एकमेकांना एका मागून एक कानाखाली मारू लागतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असेही म्हणू लागले आहेत की, वधू-वरांच्या भांडणाचा हा व्हिडीओ खोटा असून त्यात अभिनय स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण कुठले आहे किंवा या व्हिडीओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही.

सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करत आहेत आणि त्यांची खिल्ली उडवत आहेत.

इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. ज्यामुळे तो ट्रेंड होऊ लागला आहे.