Gold Rate | सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सोने चांदीच्या दरांमध्ये उतार - चढ दिसून येत आहे. भारतातही सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी आहे.

Updated: Apr 26, 2022, 04:00 PM IST
Gold Rate | सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सोने चांदीच्या दरांमध्ये उतार - चढ दिसून येत आहे. भारतातही सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, तसेच अक्षय्य तृतीया जवळ असल्याने सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (mcx)मध्ये सोन्याचे दर 51567 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर 65353 रुपये प्रति तोळे इतके आहे. 

मुंबईमध्ये सोन्याच्या दरांमध्ये कालच्या तुलनेत 400 रुपयांनी घसरण नोंदवण्यात आली. आज मुंबईतील सोन्याचे दर  53,440 रुपये प्रति तोळे इतके आहे. तर चांदीचे दर 65,700 रुपये प्रति किलो इतके आहे.

किंमत जाणून घ्या...

घरबसल्या सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करा. काही वेळाने तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यामध्ये तुम्ही सोने चांदीच्या अद्यावत दर तपासू शकता.