Wedding Insurance policy : हिंदू धर्मात लग्न हे एक पवित्र विधी मानला जातो. लग्न म्हणजे दोन लोकांसोबत दोन कुटुंबाच मिलन असतं. वधू वराचं लग्न ठरल्यावर हळदी आणि काही विधी या लग्न सोहळ्यात केले जातात. पण गेल्या काही वर्षांपासून या लग्नसोहळ्याला ग्लोबल आणि मोठं इव्हेंटच स्वरुप मिळालंय. चार पाच दिवस चालणारा या सोहळ्यांवर लाखो रुपये पाण्यासारखे पैसे खर्च केले जातात. हळद, कॉकटेल पार्टी आणि बरंच काही या सोहळ्यात होतं. पण जर काही कारणामुळे हे लग्न रद्द किंवा पुढे ढकल्याव लागलं तर त्या दोन्ही कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान होतं. म्हणून हेच बाब लक्षात घेत आज लग्न सोहळाचाही विमा करण्यात येतोय. ही एक काळाची गरज ठरत आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या डेटानुसार या वर्षी देशभरात सुमारे 35 लाख विवाह होणार आहेत. ज्यामध्ये अंदाजे 4.25 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. गेल्या काही काळात लग्न समारंभात पैशाची गुंतवणूक सातत्याने वाढताना दिसत आहे. ग्लोबल वेडिंग सर्व्हिसेस मार्केटच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये विवाहसोहळ्यांवरील खर्च 60.5 अब्ज डॉलर अब्ज झाला होता. जो 2030 पर्यंत 414.2 अब्ज डॉलरवर बिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तविण्यात आलाय.
विवाह सोहळ्यासाठी एवढा मोठा खर्च हा प्रकारची असुरक्षित गुंतवणूक असते. अशा स्थितीत लग्न रद्द झालं, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्फोट झाला, आग किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्तीमुळे विवाहसोहळ्यावर परिणाम झाला तर मोठं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी अनेक कंपन्यांनी आता वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीसारख्या योजना मार्केटमध्ये आणल्या आहेत. हे लग्न सोहळ्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करणार आहे. या विम्याचं प्रीमियम इव्हेंटच्या स्वरुपावर ठरवलं जाईल.
कोणत्याही कारणास्तव लग्न रद्द झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तारीख बदलली झाल्यास, हॉटेल आणि वाहतूक बुकिंगसह खाद्य विक्रेत्यांना दिलेले पैसे आणि घर किंवा लग्नाचे ठिकाण सजवण्यासाठी, हे सर्व या विम्यामध्ये कव्हर होणार आहे. विमा कंपनी या नुकसानीची भरपाई तुम्हाला देणार आहे.
ॲड-ऑन आणि रायडर्सचीही सुविधा असून काही अनुचित प्रकार घडल्यास, अशा विशिष्ट परिस्थितीत रायडर्स तुमच्या मदतीस येणार आहे.
प्रत्येक विम्याचे काही नियम आणि कायदे असतात हे तुम्हाला माहितीय. तसंच लग्न सोहळ्याच्या विमाबद्दलही नियम आहेत. या विम्यातही तत्सम अटी लागू असणार आहेत. उदाहरणार्थ, कोणत्याही जन्मजात आजारामुळे, अपहरणामुळे किंवा आत्महत्यामुळे मृत्यू झाल्यासही हा विमा वैध नसणार आहे. तसंच, दहशतवादी हल्ला किंवा अनैसर्गिक इजा झाल्यास, हे धोरण वैध नसणार आहे.
अनेक मोठ्या कंपन्या या विमा पॉलिसी देत असून त्यात बजाज अलियान्झ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.