VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद

Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय. 

नेहा चौधरी | Updated: May 24, 2024, 01:01 PM IST
VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद title=
jethani poisoned devrani baby cctv video viral on social media trending now

Viral Video : नातं आणि विश्वाला तडा जाणारी एक घटना समोर आली आहे. थोरली जाऊ ही धाकटीसाठी बहिणीचं रुप असतं. तर तिच्या मुलांसाठी ती मोठी आई असते. पण सध्या समोर आलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहेत. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला विष पाजताना दिसत आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

झालं असं की, धाकट्या जावूचे दोन मुलं याआधी संशयास्पदरीत्या मरण पावतात. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. सासरी नवरा बायको थोरली जावू आणि तिचा नवरा, मुलं असं सगळे राहत होते. त्यामुळे आपल्याला मुलांना नेमकं काय होतंय याची तिला कल्पना नव्हती. पण तिला थोरल्या जावूवर संशय होता. म्हणून तिने तिच्या खोलीत सीसीटीव्ही लावला होता. 

या व्हिडीओमधून जावूचं सत्य सगळ्यांसमोर आलं. तो चिमुकला निरागस जीव खोलीतील पलंगावर मच्छरदाणीत झोपला होता. तेवढ्यात एक महिला खोलीत येते जिच्या कमरेवर एक लहान मुलगा बसलेला आहे. ती ब्लाऊजमधून औषध काढते आणि मच्छरदाणी बाजूला करुन त्या झोपलेल्या बाळाच्या तोंडात थेंब देते. औषध देत असताना बाळ जाग होतं आणि ती तिथून पळ काढते. 

पण थोड्या वेळाने ती महिला परत येते आणि मच्छरदाणी बाजूला करुन त्याला बाळाला विष देते आणि खोलीबाहेर जाते. खोलीच्या दाराजवळ उभी राहून ती पाहत असते अन् ती परत येते त्या बाळाच्या डोक्याला हात मारते आणि तिथून निघून जाते. 

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बाडमेरच्या भद्रेश गावातील असून त्या बाळाची आई आंघोळ करुन परतल्यावर ते बाळ गंभीर स्थितीत तिला दिसलं. त्या बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 3 दिवस आयसीयूमध्ये भरती केल्यानंतर डॉक्टरांच्या उपचाराला त्याने प्रतिसाद दिला. ते बाळ आता सुखरुप आहे. 

सदर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर NCMIndia Council For Men Affairs यावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी सुरु असून महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.