बॉयफ्रेंडने आपल्या ग्रडफ्रेंडला कारच्या टपावर बांधून शहरभर फिरवले... पण का? पाहा व्हिडीओ

या जगात वेड्या लोकांची कमतरता नाही आणि जेव्हापासून सोशल मीडिया इतके लोकप्रिय झाले आहे.

Updated: Aug 4, 2021, 03:39 PM IST
बॉयफ्रेंडने आपल्या ग्रडफ्रेंडला कारच्या टपावर बांधून शहरभर फिरवले... पण का? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : या जगात वेड्या लोकांची कमतरता नाही आणि जेव्हापासून सोशल मीडिया इतके लोकप्रिय झाले आहे, तेव्हापासून विचित्र गोष्टी करणाऱ्या या लोकांच्या संख्येत वाढ होत आहेत. काही लोकं फेमस होण्यासाठी तर काही लोकं त्यांचे फॉलोअर्स आणि Views वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ठरवून करत असतात. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, एका व्यक्तीने मुर्खपणाचे काम केले आहे, ज्याबद्दल आता प्रत्येकजण चर्चा करत आहे.

खरं तर, इंस्टाग्रामवर लोकप्रिय असलेल्या सर्गेई कोसेन्को (sergey kosenko) नावाच्या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेडला कारच्या छतावर बांधले आणि त्याचा व्हिडीओ देखील बनवला. ज्याला त्याने सोशल मीडियावरती अपडेट केला आहे.रशियातील रहिवासी सर्गेईचे हे कृत्य पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झाले आहेत.

सेर्गेईचे इन्स्टाग्रामवर 5 मिलीयनहून अधिक (50 लाख) फॉलोअर्स आहेत आणि त्याने त्याचे फोलोवर्स वाढवण्यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडला कारच्या टपावरती बांधले होते.

परंतु या कृत्यावर तो म्हणतो की, त्याला आणि त्याच्या मैत्रिणीला एकमेकांवर 'ट्रस्ट टेस्ट' करायची होती, म्हणूनच त्याने तिला कारच्या टपावर बांधले आणि व्हिडीओ बनवला. परंतु त्याला असे करणे महागात पडले कारण पोलिसांनी त्याला या कृत्यासाठी मोठा दंडही ठोठावला आहे. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपासही करत आहेत.

व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेंडला कारच्या छतावर दोरी आणि टेपने बांधून ठेवले आणि तो कार चालवू लागला, ते देखील एका हाताने. कारण त्याचा दुसरा हात त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या हाताला बांधला होता. त्यानंतर तो शहरातील रस्त्यावर कारने फिरत आहे. येणारे आणि जाणारे लोक हे दृश्य आश्चर्याने पाहत आहेत. प्रेमाची चाचणी करण्याचा हा मार्ग लोकांना अजिबात आवडला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहून, जिथे काही लोक सेर्गेची खिल्ली उडवत आहेत, तर काही लोकांचे हे मुर्खपणाचे लक्षण पाहून राग येत आहे. एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले की, हे चांगले नाही आणि त्याचा तुमच्यावर फॉलो करणाऱ्या लोकांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि ते सुद्धा असेच काही करू शकतात. त्यामुळे तुम्ही हे समजणे गरजेचे आहे.