युवकाचा swimming pool तुम्ही एकदा पाहाच....असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसणार

एक व्यक्ती swimming pool मध्ये मोठ्या आनंदाने पोहत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष आहे? 

Updated: Jul 25, 2021, 09:27 PM IST
युवकाचा swimming pool तुम्ही एकदा पाहाच....असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसणार title=

मुंबई : जुगाड म्हंटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते भारतीयांचं. कारण, भारतीयांचा हात जुगाडामध्ये कोणीच पकडू शकत नाही. कोही लोकांचे जुगाड इतके भारी असतात की, तुम्हाला तो पाहून धक्काच बसेल. तर काही जुगाड पाहून लोकांना त्या व्यक्तीची प्रशांसा करायला भाग पाडते ज्याने हा जुगाड केला आहे. तेव्हा लोकांच्या मनात असा देखील विचार येत असतो की, असं आम्हाला का नाही सुचलं? असाच एक लोकांना विचार करायला लावणारा जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही देखील या जुगाडाच्या प्रेमात पडाला.

या व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती swimming pool मध्ये मोठ्या आनंदाने पोहत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष आहे? तर तुम्हाला त्या व्हिडीओला निट पाहावं लागेल, या व्हिडीओमधील पाण्याचा pool पाहा तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कारण हा सामान्य स्विमिंग पूल नाही, तर हा जुगाडवाला स्विमिंग पूल आहे. एका ट्रॉलीमध्ये बनवलेला जुगाडू पूल आहे.

या बुद्धिमान माणसाने ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये प्लास्टिकची मोठी चादर लावून त्यात पाणी भरले आहे आणि त्यात तो आनंदाने पोहण्याची मजा घेत आहे.

हा जुगाडू pool या माणसाला swimming poolचा अनुभव देत आहे. व्हिडीओमध्ये, आपण पाहु शकता की, आणखी एक व्यक्ती ट्रॅक्टरजवळ उभी आहे, जी यामध्ये पोहणाऱ्या व्यक्तीला पाहून हसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हायरल होणारा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा गमतीदार व्हिडीओ खूप आवडला आहे. लोकं हा व्हिडीओ नुसता एकमेकांसोबत शेअरच करत नाहीत, तर त्यावर लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स देखील करत ​​आहेत. या व्यक्तीचा जुगडा सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडला आहे  त्यामुळे लोकं याचे कौतुक केल्याशिवाय स्वत:ला थांबवू शकत नाहीत.