प्रेमाची परीक्षा घेणे Girlfriend ला पडलं महाग... व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल 'आंधळं प्रेम करण्याचे दिवस गेले'

एक प्रेमी जोडप्याच्या प्रेमाच्या खेळाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Jul 25, 2021, 09:21 PM IST
प्रेमाची परीक्षा घेणे Girlfriend ला पडलं महाग... व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल 'आंधळं प्रेम करण्याचे दिवस गेले' title=

मुंबई : सोशल मीडियाच्या या जगात आपल्याला एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात. यात काही लोकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना विचार करायला लावणारे असतात, त्यात काही व्हिडीओ हे लोकांना एक चांगला संदेश देखील देऊन जातात जो, लोकांना आयुष्यात विचार करायला भाग पाडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला ही शिकवण देत आहे की, डोळे बंद करुन कधी कोणावरती विश्वास ठेऊ नका. प्रेमात तर नाहीच नाहीच नाही.

आपल्याला तर हे माहित आहे की, काही जोडपी आपल्या प्रेमाची परीक्षा घेत असतात. त्यासाठी ते वेगवेगळे खेळ खेळतात. अशाच एक प्रेमी जोडप्याच्या प्रेमाच्या खेळाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी एका प्रोग्राममध्ये ट्रस्ट गेम खेळत आहेत. पण या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला धोका दिला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर उभी असलेली मुलगी, तिच्या प्रियकराशी बोलल्यानंतर, त्याच्याकडे पाठ करुन उलटी उभी रहाते. खेळाच्या (ट्रस्ट गेम नियम) नियमांनुसार अशी अपेक्षा केली जात होती की, जेव्हा ती मुलगी मुलावर विश्वास ठेऊन पाठी न पाहाता उलटी पडेल, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिला पकडणार. परंतु तसे न होता जशी ही मुलगी उलटी फिरते हा मुलगा दुसऱ्याच एका मुलीला घेऊन निघून जातो.

पण या मुलीला हे माहित नव्हते ती आपली प्रेमावर विश्वास ठेऊन पाठी पडते. त्यावेळेला बाजूला उभा असलेला दुसरा मुलगा त्या मुलीला पकडण्यासाठी पुढे येतो, परंतु त्याचा काही फायदा होत नाही आणि ही मुलगी खाली पडते.

थोडक्यात काय तर या प्रेमाच्या परीक्षेत या मुलीचा बॉयफ्रेंड फेल ठरतो, ज्याचा परिणाम त्या मुलाला नाही, तर त्याच्यावर आंधळा विश्वास करणाऱ्या मुलीलाच भोगावा लागतो. म्हणूनच तर म्हणतात आंधळं प्रेम करु नये. आता प्रेम हे आंधळं असतं असा म्हणायचे दिवस गेले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर बर्‍याच जणांना आवडला आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओवर त्यांचे मत देखील व्यक्त केले आहे. एका वापरकर्त्याने सांगितले की हे दृश्य खरोखरच मजेदार होते. दुसरीकडे दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, प्रेमावरील आंधळा विश्वास चांगला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ निरंजन महापात्राने इन्स्टाग्रामवर (Instagram Reels Video) शेअर केला आहे. ही बातमी लिहिण्यापर्यंत 17 हजारांहून अधिक लोकांनी याला पाहिले आहे.