रागावलेल्या नववधूसोबत नवरदेवानं असं करायला नको हवं होतं... पाहा नक्की काय घडलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आणि नवरी काहीतरी विधी करत आहेत.

Updated: Feb 20, 2022, 06:59 PM IST
रागावलेल्या नववधूसोबत नवरदेवानं असं करायला नको हवं होतं... पाहा नक्की काय घडलं title=

मुंबई : सध्या लग्नाचं सिझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडीओ लग्नातील विधींचे असतात. तर काही व्हिडीओ लग्नादरम्यानच्या घटनांचे असतात. जे लोक एकमेकांना शेअर करतात आणि त्याचा आनंद घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच लग्नादरम्यानचा व्हिडीओ व्हायर होत आहे. जो पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, 'व्हा! दीदी मौज करदी....'

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आणि नवरी काहीतरी विधी करत आहेत. त्यादरम्यान नववधू असं काहीतरी करते जे पाहून तुम्हाला हसू येईल. परंतु या घटनेच्या वेळी मात्र उपस्थित लोकांना धक्का बसला आहे.

वधू-वरांचा हा व्हिडीओ अल्पावधीतच लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला 1.14 लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे.

या व्हिडीओमध्ये नवरदेव नववधूला मिठाई भरवताना दिसत आहे. परंतु त्याचवेळी नववधू त्याच्यावर रागावते आणि त्याच्या हातातून मिठाई हिस्कावून घेते आणि त्याला फेकून देते. नववधूचं हे वागणं पाहून तिला नवऱ्याचा राग आलं असल्याचं दिसतंय, परंतु तिला हा राग का आला होता या मागचं कारण कळलेलं नाही.

नववधूने मिठाई फेकून दिल्यावर नवऱ्यानं देखील तिच्या सारखं रागवण्याचं ठरवलं. त्यामुळे जेव्हा नववधू नवरदेवाला ग्लासातून काहीतरी पाजायला जाते, तेव्हा नवरदेव त्या ग्लासला ढकलून देतो.  जे पाहून पुन्हा नववधूला राग येतो आणि ती तो ग्लास लांब फेकून देते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही घटना पाहून उपस्थित लोकांना धक्का बसला आहे. परंतु ही घटना खरोखरंच मनोरंजक आहे. सोशल मीडीयावर अनेक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यामुळे लोक त्याला भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याचाच बोलबाला आहे. इंस्टाग्रामवर घंटा नावाच्या पेजवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.