7 मुलांना वाचवून 'तो' बनला देवदूत; पण स्वतःच्या जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही.. झाशी अग्निकांडातील हृदयद्रावक घटना

Jhansi Tragdey :  झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं अग्नितांवड  अंगावर काटा आणणारा आहे. येथे NICU वॉर्डमधील 10 मुलांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पण या सगळ्यात एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून 7 मुलांचा जीव वाचवला. पण आपल्या मुलांना मात्र तो वाचवू शकला नाही.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 18, 2024, 03:04 PM IST
7 मुलांना वाचवून 'तो' बनला देवदूत; पण स्वतःच्या जुळ्या मुलींना वाचवू शकला नाही.. झाशी अग्निकांडातील हृदयद्रावक घटना  title=

झाशी मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्यामुळे मुलांचा जळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पण या सगळ्यात एक 25 वर्षीय याकूब मंसूरी अक्षरशः 'देवदूत' बनला आहे. या व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून 10 बालकांचा जीव वाचवला आहे. सगळ्यांनी याकूबचं कौतुक केलं पण याकूब स्वतःच्या जुळ्या मुलींचा जीव वाचवू शकला नाही. ही घटना उत्तर प्रदेशच्या झाशी मेडिकल कॉलेजमध्ये घडली आहे. 

हमीरपुरचे रहिवाशी याकूब एक साधं दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण याकूब हे ते दुर्दैवी बाब ठरले ज्यांची झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या NICU मधील जुळ्या मुलांना वाचवू शकला नाही. याकूब यांच्या पत्नी नजमाने काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिला होता. दोघींना तेथे NICU मध्ये दाखल केले होते. शुक्रवारी रात्री याकूब वॉर्ड बाहेरच झोपले होते. 

अचानक आग लागल्यामुळे धूर पसरू लागला. यावेळी याकूबने खिडकी तोडली आणि युनिटच्या आत घुसला. त्यांनी हिंमत दाखवून एक एक मुलांना बाहेर सुरक्षित काढलं. मात्र यामध्ये त्या स्वतः आपल्या जुळ्या मुलींना वाचवू शकले नाहीत. शनिवारी दोन्ही मुलींचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 याकुब आणि नजमा दिवसभर हॉस्पिटलच्या बाहेर एकमेकांचे हात धरून अश्रू पुसत राहिले. झाशीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष आणि वैद्यकीय संस्थांमधील सुरक्षा निकषांचे अज्ञानही समोर आले आहे. मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डातील 10 कुटुंबांची स्वप्ने पूर्ण होण्याआधीच धुळीस मिळाली. रुग्णालयाबाहेर ओरडणाऱ्या कुटुंबीयांचे अश्रू परिस्थितीची कहाणी सांगत आहेत.

अशाच वेदना संजना कुमारीला सहन कराव्या लागत आहेत, ज्यांनी अलीकडेच आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. संजना म्हणाली- माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि मी असहाय्यपणे पाहत राहिली. मी माझ्या मुलाला माझ्या मांडीवर घेवू  शकले नाही. माझा संसार उद्ध्वस्त झाला. निरंजन  नावाच्या व्यक्तीने त्यांच्या शरीरावरील टॅगवरून त्यांच्या नातवाची ओळख पटवली. रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने आपण सर्व उद्ध्वस्त केल्याचे ते म्हणाले.