UP Accident: उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये मोठा अपघात झालाय. गंगा स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटलाय. या अपघातामध्ये 7 मुले आणि 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणाच्या घराबाहेर 3 तर कोणाच्या घराबाहेर 4-5 मृतदेह ठेवण्यात आले होते. सर्वात आधी गौरव यांचा दीड वर्षाचा मुलगा सिद्धू याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा शव पुरण्यात आला. यावेळी संपूर्ण गावातील घराघरातून रडण्याचा आवाज येत होता.
गावातील बिट्टो देवीच्या परिवारातील 5 सदस्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. काही मृतांचे नातेवाईक अद्याप गावात पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उशीरा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कासगंज येथील रस्ते अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुख व्यक्त केलंय. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. सर्व जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जनपद कासगंज में सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत हृदय विदारक है। मेरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं।
जिला प्रशासन के अधिकारियों को सभी घायलों के समुचित निःशुल्क उपचार हेतु निर्देश दिए हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति तथा घायलों को शीघ्र…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 24, 2024
या अपघातामध्ये मोठ्या संख्येत लोकांचा मृत्यू झालाय तर अनेकजण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. 4 मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. सर्व अपघातग्रस्त हे जैथरा ठाणे क्षेत्रातील एका छोट्या गावचे रहिवासी होते. माघ पौर्णिमेनिमित्तर हे लोक गंगा स्नानासाठी कासगंड पटियालीच्या कादरगंज गंगा घाटावर जात होते. हा अपघात दरियावगंज पटियाली मार्गावरील गढई गावाजवळ झाला. आज माघ पोर्णिमा असल्याने मोठ्या संख्येने भाविक गंगेत स्नान करण्यासाठी येत असतात.
असाच एक अपघात 2 वर्षांपुर्वी उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये झाला होता. हरदोईच्या पाली ठाणे क्षेत्रात शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली गर्रा नदी पुलाची रेलिंग तोडून नदीमध्ये पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरमध्ये 25 ते 30 शेतकरी होते. ज्यातील 6 शेतकरी पोहून नदीबाहेर आले तर इतरांबद्दल काही माहिती समोर आली नाही. दरम्यान बुडालेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी अनेक दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते