PNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला

Indian Navy : भारतीय नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तब्बल 53 वर्षानंतर नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा म्हणजेत गाझी सबमरिनचे (Pakistani submarine PNS Ghazi) अवशेष सापडले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Feb 24, 2024, 08:12 PM IST
PNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला title=
Pakistani submarine PNS Ghazi

Pakistani submarine PNS Ghazi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आत्तापर्यंत तीन युद्ध झाली. 1948, 1971 आणि 1998... मात्र, या व्यतिरिक्त आणखी एक युद्ध झालं. त्याची कोणत्याही खुण नव्हती ना कोणता पुरावा... होय, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक युद्ध झालं, ते युद्ध लढलं गेलं समुद्रात... 1971 च्या युद्धात भारतीय सबमरिन आणि पाकिस्तानी सबमरिन यांच्या घनघोर युद्ध झालं होतं. या युद्धात भारतीय नौसेनेने पाकिस्तानची सबमरिन गाझीचा (PNS Ghazi) खात्मा करत सबमरिन बंगालच्या उपसागरात बुडवली होती. पाकिस्तानने वारंवार यावर नकार दिलाय. अशातच आता नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तब्बल 53 वर्षानंतर नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा म्हणजेत गाझी सबमरिनचे अवशेष सापडले आहेत.

भारतीय नौदलाच्या डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल (DSRV)  1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बुडालेली पाकिस्तानाची पाणबुडी पीएनएस गाझीचे अवशेष मिळाले आहेत. विशाखापट्टनम समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 2 ते 2.5 किमी अंतरावर आणि सुमारे 100 मीटर खोलीवर आढळल्याची माहिती समोर आली आहे. दोन पाणबुड्या विझाग किनाऱ्याजवळ समुद्राच्या तळाशी असल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. त्यातील एक सबमरिन जपानी सबमरिन असल्याची माहिती समोर येत आहे. 

भारताने 2018 मध्ये बुडालेली जहाजे आणि पाणबुडी शोधून काढण्यासाठी डीप सबमर्सिबल रेस्क्यू व्हेईकल विकत घेतले होते. त्यानंतर भारताने अनेक उपक्रम राबवले. अशातच आता डीप सबमर्सिबल रेस्क्यू व्हेईकल सर्वात मोठं यश मिळालं. पाकिस्तान ज्यावर सात्त्याने नकार देत होतं, त्याचे भक्कम पुरावे भारताच्या हाती लागले आहेत. भारतीय नौसेनेच्या कामगिरीवर एक सिनेमा देखील आला होता. द गाझी अटॅक हा सिनेमा तुम्हीही नक्की पहायला हवा. अंगावर काटा आणणारा हा सिनेमा पाहून तुम्हालाही गर्व वाटेल.

3 डिसेंबर 1971 रोजी नेमकं काय झालं?

कमांडर इंदर सिंग यांना सात वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र आणि 'गाझी डिस्ट्रॉयर' ही पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मनोधैर्य वाढवणारी कथा सांगितली होती. बंगालच्या उपसागरात भारतीय युद्धनौका विक्रांत नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने गाझी पाणबुडी पाठवल्याची बातमी गुप्तचर संस्थेकडून आली होती. त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय नौसेनेने मोर्चा उघडला. देशाची शान असलेल्या विक्रांतला वाचवण्यासाठी आयएनएस राजपूतला पाठवण्यात आलं होतं.

इंदर सिंग या सबमरिनचे कमांडर होते. आयएनएस राजपूतला बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम, चेन्नई आणि कोलकाता पर्यंत गाझी पाणबुडी शोधून नष्ट करण्याची जबाबदारी मिळाली होती. विशाखापट्टनम बंदरातून बाहेर पडत असताना जहाजावर बसवलेल्या सोनार यंत्रणेला समुद्राच्या खोलीत 3 नॉटिकल मैल अंतरावर काहीतरी हालचाली दिसल्या.

त्यावेळी त्याठिकाणी गाझी सबमरिन असल्याचं निश्चित झालं. त्यानंतर भारतीय सबमरिनने गाझीवर हल्ला करत सबमरिन बुडवली होती, अशी माहिती कमांडर इंदर सिंग यांनी दिली. आम्ही मागे वळून पाहिले तेव्हा समुद्राचे पाणी शेकडो मीटरपर्यंत उकळू लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छिमारांना पाकिस्तानी सैनिकांचे लाईफ जॅकेट तरंगताना दिसले, असं कमांडर इंदर सिंग यांनी म्हटलं होतं.