Parrot Shocking Case in Agra: असं म्हटलं जात की पोलीस दिसले की हवा टाईट होते, त्यांच्यासमोर काय बोलाव हे कळत नाही, बोलताना दातखिळी बसते. तसेच पोलिसांसमोर पोपटपंची देखील चालत नाही. मात्र या घटनेत पोपटपंची चालली आहे, तेही पोलिसांसमोर आणि पोलीस देखील पाहतच राहिलेत. नेमकं या घटनेत घडलं काय आहे, हे जाणून घेऊयात.
दोन हायप्रोफाईल कुटूंबिय पोलिस ठाण्यात एका परदेशी पोपटाला (parrot) घेऊन गेले होते. या दोन्ही कुटूंबियांनी पोपटावर दावा केला होता. दोन्ही कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार हा पोपट त्यांचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे यातला खरा मालक कोणता आहे? हा मोठा प्रश्न होता. पोलीसांनी देखील अशाप्रकारचं प्रकरण पोलिस ठाण्यात आल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले होते.
या घटनेत एक कुटूंब गेल्या तीन वर्षापासून विदेशी पोपटाचा (parrot) सांभाळ करत होते. हा पोपट त्यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटूंबाने दिला होता. त्यानंतर आता ते कुटूंब त्यांच्याकडून आपल्या पोपटाला परत देण्याची मागणी करत होते. मात्र गेल्या तीन वर्षापासून त्यांनी पोपटाचा सांभाळ केल्यामुळे त्यांचं त्याच्याशी खुपच जवळच नातं निर्माण झालं होते.त्यामुळे त्यांनी पोपटाला देण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे या घटनेत कुटूंबिय पोपटचा (parrot) दावा करणाऱ्याला पैसे द्यायलाही तयार होते.मात्र त्यांनी यास नकार दिला होता.
दोन्ही कुटूंबियांच म्हणण ऐकल्यानंतर नेमका निकाल काय द्यायचा, असा पेच पोलिसांसमोर होता. मात्र पोलिसांनी सर्व निकाल पोपटावर (parrot) सोडला होता. पोलिसांनी पोपटाला टेबलावर ठेवले आणि त्याच्या बाजूला दोन्ही कुटूंबियांना उभे केले होते. आता पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि ज्या मालकासमोर उभा राहेल, पोपट त्याला ताब्यात देण्यात येणार होता. आणि तसेच झाले पोपट त्याच्या खऱ्या मालकाकडे मम्मी-पप्पा म्हणत गेला. अशाप्रकारे मालकाला त्याचा पोपट मिळाला
अशाप्रकारे पोपटाचा (parrot) निकाल पोपटानेच लावला आणि त्याच्या मालकाला त्याचा आवडता पोपट देखील मिळाला. उत्तर प्रदेशच्या आगरामध्ये ही घटना घडलीय. ही घटना वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.