Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जाताना ही दुदैवी घटना घडली आहे. या अपघात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. कुन्नूरमधील मारापलमजवळ दरीत ही बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
#WATCH | Tamil Nadu | 9 people were killed after a bus carrying 60 passengers, met with an accident near Coonoor in Tamil Nadu's Nilgiris district yesterday. The bus was on its way from Coonoor to Tenkasi with passengers who were on a tour to Ooty and were returning home; outside… https://t.co/vw9YJAdScK pic.twitter.com/1qSg1GKreZ
— ANI (@ANI) October 1, 2023
मिळालेल्या माहितीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे. या अपघातात मृत पावलेल्यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय.
Tamil Nadu bus accident: CM Stalin announces Rs 2 lakh ex-gratia for kin of deceased
Read @ANI Story | https://t.co/Z52fDH9pjG#TamilNadu #MKStalin #accident pic.twitter.com/GGUs8ftcAs
— ANI Digital (@ani_digital) September 30, 2023
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असं X वर पोस्ट करण्यात आली आहे.
Pained by the loss of lives due to a bus accident near Coonoor in Nilgiris district, Tamil Nadu. My thoughts are with the bereaved families. I pray that the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. Those…
— PMO India (@PMOIndia) October 1, 2023
तर PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.