Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. असंच काहीसं ओडिशाच्या राउरकेला शहरात राहणाऱ्या सौमेंद्र जेना यांच्यासोबत झालं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दोन गोष्टींचे फोटो शेअर करत या प्रवासाविषयी सांगितलं आहे. त्यांनी शेअर केलेला एक फोटो हा राउरकेला येथील त्यांच्या जुन्या घराचा आहे जे खूपचं छोटं आहे. तर दुसरीकडे हा 12वीं पास दुबईमध्ये कसा आता लग्झरियस बंगल्यात राहतात. त्यांच्याकढे पोर्श टायकन आणि जी वॅगन ब्राबस 800 गाड्या आहेत. आता इथपर्यंतच प्रवास कसा होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रात्र-दिवस मेहनत आहे.
सौमेंद्र जेना यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौमेंद्रनं दोन फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत सौमेंद्रनं कॅप्शन दिलं की हे माझं जुनं घर होतं-ओडिशाचं छोटसं शहर राउरकेला येथे आहे. इथेच माझा जन्म झाला. लहाणाचा मोठा झालो आणि 12 वी पर्यंत शिकलो. 2021 मध्ये या सगळ्या आठवणी जगण्यासाठी परत गेलो. आज दुबईतलं माझ घर ही तब्बल 17 वर्षांची मेहनत आहे. न झोपता सतत काम केलं कोणतंही कारण दिलं नाही. यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. आता तुमचं कारण काय आहे?
This was my home back then—a small town in Odisha, Rourkela, where I was born, grew up, and studied till class 12 (1988-2006). Revisited in 2021 for the memories!
Today, my home in Dubai tells the story of 17 years of relentless hard work, sleepless nights, and no shortcuts.… pic.twitter.com/nw5tCdtwKE— Soumendra Jena (@soamjena) January 24, 2025
अनेक लोकांनी सौमेंद्र जेना यांची ही पोस्ट पाहता त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर त्यानं केलेल्या स्ट्रगलसाठी त्याला शाब्बासकी दिली आहे. एका नेटकऱ्यानं सांगितलं की 'स्वप्न ही पूर्ण होतात. यशस्वी होणं म्हणजे खूप मेहनत करावी लागते. न झोपता आणि कोणताही शॉर्टकट घेतले नाही तर यश मिळतं. आनंद आहे की तुम्ही तुमच्या मुलांनासोबत घेऊन गेलात. तुमच्या मुलांना तुम्ही किती मेहनत केली हे नक्कीच कळणार त्यांना त्याची जाणीव राहिल.'
हेही वाचा : लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...
सौमेंद्र जेना यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते आर्थिक क्षेत्रातील एक लोकप्रिय कन्टेन्ट क्रिएटर आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 3,00,000 पेक्षा जास्त आणि युट्यूबवर त्यांचे जवळपास 487,000 सब्सक्रायबर्स आहेत. ते त्यांच्या कंटेन्टच्या मदतीनं आर्थिक विषयांना सोप्या भाषेत समजवतात. गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात आणि लोकांना आर्थिक विषयांवर योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. सौमेंद्र जेना यांनी आयुष्यात जे काही केलं आहे त्यामुळे अनेकांना प्रोत्साहित केलं आहे.