Viral Video | कोंबड्याला कुठं माहित तो आहे मगरीच्या पाठीवर! त्यानं उडी मारली अन्...

सोशल मीडियावर एक मगर आणि कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Updated: Mar 31, 2021, 01:56 PM IST
Viral Video | कोंबड्याला कुठं माहित तो आहे मगरीच्या पाठीवर! त्यानं उडी मारली अन्... title=

 Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच मजेदार व्हिडिओ शेअर होत असतात. त्यात काही मनोंरजनात्मक असतात, तर काही भयावह असतात. काही खतरनाक व्हिडिओ पाहून भल्या भल्यांच्या काळजाचा ठोका चूकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहूया
 
सध्या सोशल मीडियावर एक मगर आणि कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक कोंबडा एका मगराच्या पाठीवर निवांत चालत आहे. 
 
कोंबडा मगराच्या पाठीवर उभा राहून नदी पार करीत आहे. नदीचा किनारा आल्यावर कोंबडा मगराच्या तोंडाच्या बाजून पुढे जाऊन किनाऱ्यावर उतरतो. तेव्हढ्यात मगर कोंबड्यावर हल्ला करतो. परंतु कोंबडा तत्काळ निसटतो. कोंबड्याचे नशीब म्हणा किंवा प्रसंगावधान तो मगराच्या तावडीतून सुटतो. 
 
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, 2020 से 2021... फिरस 2021 की शुरूवात... बस ऐसी है'.
 
सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळतेय. त्यामुळेच हा व्हिडिओ मोठ्या  प्रमाणावर शेअर केला जात आहे.