Navi Mumbai Airport: नवी मुंबईत नव्या विमानतळासह नवा नियमही लागू होणार?10 किमीच्या परिघात...

Navi Mumbai Airport : मागील काही वर्षांपासून अतिशय महत्त्वाकांक्षी आणि प्रशासनाच्या दृष्टीक्षेपात असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील महत्त्वाची बातमी.   

सायली पाटील | Updated: Jan 7, 2025, 01:01 PM IST
Navi Mumbai Airport: नवी मुंबईत नव्या विमानतळासह नवा नियमही लागू होणार?10 किमीच्या परिघात...  title=
new rule issued for 10 km area from navi mumbai airport location read details

Navi Mumbai Airport New Rule : काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर अधिकृतपणे पहिल्या विमानाचं लँडिंग झालं आणि लगेचच एप्रिल महिन्यापासून या विमानतळावर विमानांच्या नियमित उड्डाणांना सुरुवात केली जाणार असल्याची तयारीसुद्धा दाखवून देण्यात आली. सिडको आणि विमानतळाचे विकासक असणाऱ्या अदानी समुह सध्या या नव्या संकल्पपूर्तीसाठी सज्ज झाला आहे. त्यातच एका नव्या नियमाचीही चर्चा सुरू झाली आहे. 

विमानतळाच्या सुरुवातीआधीच राज्यातील नगरविकास विभागानं एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीची स्थापना केल्याचं कळत आहे. वरील समितीच्या स्थापनेसह आता (Navi Mumbai Airport) नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणापासून 10 किमी पर्यंतच्या परिघापर्त प्राण्यांची कत्तल करणं, त्यांचे अवशेष किंवा कातडी, कचरा टाकणं आणि इतर कोणतेही घातक पदार्थ टाकण्यास मनाई असणार आहे. यासाठी सातत्यानं या समितीच्या बैठकासुद्धा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कसं काम करेल ही समिती? 

सदर विमानतळाच्या 10-10 किमीच्या क्षेत्रात पर्यावरण स्वच्छता राखण्यासाठीच्या उपाययोजना ही समिती सुचवणार आहे. यासाठी दर महिन्याला बैठक घेतली जाणार आहे. राहिला प्रश्न हा नियम का लागू केसा जातोय? तर, प्राण्यांचे टाकलेले अवशेष अनेक प्रकारचे पक्षी खातात. ज्यामुळं विमानतळ परिसरामध्ये असे अवशेष, जनावरांची कातडी असल्यास इथं पक्ष्यांची संख्या वाढून इथं विमानांच्या उड्डाणाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळेच इथं प्राण्यांची कत्तल करून त्यांचे अवशेष फेकण्यास मनाई करण्यात येत आहे.

हेसुद्धा वाचा : भारतीय भूमीत दडलीयेत कैक रहस्य; तामिळनाडूत 3200 वर्षांपूर्वीचे पुरावे समोर आल्यानं सारे अवाक्, पाहा... 

पर्यावरणीय समितीमध्ये सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्षपदी राहणार असून, त्यासोबत नवी मुंबई पोलीस आयुक्त, पनवेल पालिका आयुक्त, विभागीय कोकण आयुक्त, पोलीस अधिक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक अशा विविध पदावरील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.