2025 मध्ये नोकऱ्या जाणार? ChatGPT च्या CEO कडून हैराण करणारं उत्तर

Job Vacancy in 2025: बातमी नोकरीची... यंदाच्या वर्षात अनेकजण नोकरीला मुकणार? तंत्रज्ञान शाप ठरणार की वरदान? पाहा तज्ज्ञांचं काय म्हणणं...   

सायली पाटील | Updated: Jan 7, 2025, 12:32 PM IST
2025 मध्ये नोकऱ्या जाणार? ChatGPT च्या CEO कडून हैराण करणारं उत्तर  title=
ChatGPT CEO surprising Reaction on Will AI take away humans jobs in 2025 question

Job Vacancy in 2025: गेल्या दशकभराच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं. नवनवीन क्षेत्रामध्ये, त्यातही माहिती आणि तंत्रज्ञान अर्थात IT क्षेत्रानं इतकी झपाट्यानं प्रगती केली की पाहणाहेरी हैराण झाले. ओघाओघानं जगाचाही वेग वाढला आणि या सर्वच गोष्टी एकमेकांशी संलग्न असल्याप्रमाणं एकमेकांवर परिणाम करताना दिसल्या. 

ChatGPT च्या येण्यानं या क्षेत्रामध्ये एक नवं पर्व सुरू झालं. अनेक बड्या कंपन्यांनी AI Tools लाँच केले. आश्चर्याची बाब म्हणजे, हे एआय टूल्स मानवाप्रमाणं एकमेकांशी संवाद साधतात. पण, या साऱ्यामध्ये जिथं यंत्रांचा वापर इतका वाढत आहेत, तिथंच या यंत्रमानवी बुद्धिमुळं अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याचा धोका अधिकच वाढताना दिसत आहे. 

मागील दोन वर्षांमध्ये अनेक कंपन्यांनी मोठ्या संख्येनं नोकरकपात केली. या साऱ्यामध्येच आता ChatGPT च्या सीईओपदी असणाऱ्या सॅम ऑल्टमॅन यांनी हल्लीच एका ब्लॉगमध्ये एआयसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. या काही अशा गोष्टी आहेत ज्या जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेला प्रभावित करू शकतात. 

ऑल्टमॅन यांच्या माहितीनुसार 2025 मध्ये एआय एजंट्सना कंपनीच्या कार्यवाहीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. थोडक्यात एआय विविध उद्योगांसाठीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या मते मानवी जीवनातीच प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीमध्ये एआय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून जगभरातील नोकरदार वर्गावर याचा परिणाम पडताना दिसणार आहे. 

OpenAI लवकरच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (AGI) मिळवणार असून, त्यामुळं येत्या काळात भविष्यात नोकरीच्या क्षेत्रात अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. 

हेसुद्धा वाचा : नवी मुंबईत नव्या विमानतळासह नवा नियमही लागू होणार?10 किमीच्या परिघात... 

भविष्यात हे एआय एजंट्स नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची आणि विविध प्रकारची कामं करणार असून, अनेकांच्या नोकरीला यामुळं धोका उदभवू शकतो. यावरून सध्या बरीच मतमतांतरं असून, नोकरी गमावण्याची भीती अनेकांनाच असल्याचं स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, ऑल्टमॅन यांच्या मचे ChatGPT हे एक टूल असून, त्यामुळं मानवी योगदानाची जागा घेतली जाणार नसून त्यांच्या बरोबरीनंच काम करणार आहे. यातूनच एआय टूल्सची उत्पादकता वाढण्यास मदत होणार असून, कोणीही नोकरीला मुकणार नाही. थोडक्यात तंत्रज्ञान  नोकरी हिरावण्याचा धोका किमान इथं संभवत नाही.