Fact Check: हजसाठी मक्केला गेला शाहरुख? गौरीच्या हिजाबमधील व्हायरल फोटोमागचं नेमकं सत्य काय?

Fact Check Shahrukh khan Gauri khan Photo: हजसाठी खरंच मक्का इथं गेला शाहरुख? गौरीच्या हिजाबमधील व्हायरल फोटोमागचं नेमकं सत्य काय?   

सायली पाटील | Updated: Jan 7, 2025, 11:36 AM IST
Fact Check: हजसाठी मक्केला गेला शाहरुख? गौरीच्या हिजाबमधील व्हायरल फोटोमागचं नेमकं सत्य काय? title=
fact check is Shah Rukh Khan visited Mecca for Hajj Gauri Khan fake photos in hijab viral deepfake

Fact Check Shahrukh khan Gauri khan Photo: सोशल मीडिया... दर दुसऱ्या व्यक्तीचा या वर्तुळात वावर असतो. सोशल मीडियामुळं जग जवळ आलं हे खरं. पण, याच सोशल मीडियावर आता 'व्हायरल' प्रकरण इतकं गाजतंय की, बऱ्याचदा माहितीऐवजी कैक चुकीच्याच आणि बनावट गोष्टींच्याच चर्चा अधिकाधिक प्रमाणात जोर धरताना दिसत आहेत. बडे सेलिब्रिटीसुद्या या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. अगदी बॉलिवूडचा किंग, शाहरुख खानसुद्धा इथं स्वत:चा बचाव करु शकलेला नाही. 

काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यनही दिसत असून लक्ष वेधतोय तो म्हणजे शाहरुखच्या पत्नीचा फोटोमध्ये दिसणारा लूक. कारण, इथं ती हिजाबमध्ये दिसत आहे. 

असा दावा केला जातोय, की शाहरुख खान नव्या वर्षाच्या निमित्तानं मक्केला पोहोचला होता. पण, या फोटोमागचं नेमकं सत्य वेगळंच आहे. कारण, हा फोटो खोटा असून, हे डीपफेकचं एक उदाहरण आहे.

डीपफेक प्रकरणानं वळवल्या नजरा 

फोटोमध्ये शाहरुख आणि आर्यन पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत असून, गौरी खान काळ्या रंगाची कुर्ती आणि राखाडी रंगाच्या हिजाबमध्ये दिसत आहे. प्रत्यक्षात व्हायरल फोटो हा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी इथं शाहरुख, गौरी आणि आर्यनच्या फोटोशी छेडछाड करत ते मक्का इथं असल्याचं भासवणारा फोटो तयार केला आहे. त्यामुळं हा फोटो आणि दावा खोटा आहे हे आता सिद्ध होत आहे. 

धर्माविषयी गौरीचं काय मत? 

शाहरुख किंवा त्याच्या कोण्याही कुटुंबीयानं या फोटोवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, 2005 मध्ये गौरीनं मात्र धर्म आणि कुटुंबाविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. आपलं आणि शाहरुखचं कुटुंब कमाल असून, आपण पतीच्या धर्माचा आदर करत आहोत असं सांगत आपण मात्र कधीच धर्मपरिवर्तन केलं नाही, किंबहुना त्यानंही कधी असं करण्यास सांगितलं नाही. त्यांच्या घरी धर्म, सणवार या साऱ्याचाच आदर केला जातो, असं गौरी म्हणाली होती.