चीन आणि पाकिस्तान हैराण, आजपासून भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार

भारतातील राफेल विमानांनी संख्या 14 होणार

Updated: Mar 31, 2021, 12:50 PM IST
चीन आणि पाकिस्तान हैराण, आजपासून भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार  title=

नवी दिल्ली : आज संध्याकाळी तीन राफेल (Rafel) लढाऊ विमान फ्रान्समधून भारतात (India) दाखल होतील. यामुळे भारतीय वायुसेनेची (India Air Force) ताकद आणखी वाढणार आहे. चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) या पारंपारिक या शत्रुंसाठी ही चिंताजनक बातमी आहे. या विमानात युएईच्या एअरबस 330 मल्टी-रोल ट्रान्सपोर्ट टँकरद्वारे ओमानच्या आखातीमधील आकाशात इंधन पुरविले जाईल. हे तिन्ही विमान अंबाला एअरफोर्स स्टेशनवरील Golden Arrows Squadron मध्ये सहभागी होतील. ही तीनही विमाने अंबाला पोहोचताच भारतातील राफेल विमानांनी संख्या 14 होणार आहे.

राफेल विमानांचं तिसऱ्यांदा भारतात पुरवठा होत आहे. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्सकडून ५९ हजार कोटींमध्ये 36 राफेल विमाने खरेदी केले. तीन नवीन विमानांच्या आगमनानंतर भारताकडे 11 राफेल विमाने असतील.
 
२९ जुलैला पाच राफेल विमानांचा पहिला सेट अंबाला एअर बेसवर पोहोचला. नंतर या पाच विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संरक्षण मंत्र्यांच्यासमवेत फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स, सीडीएस बिपिन रावत आणि हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया देखील उपस्थित होते.

राफेल विमानांची पुढची खेप एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतात पोहोचेल. भारतीय वायुसेना राफेल विमानांची दुसरी  स्क्वाड्रन (squadron)बनवेल. जी पश्चिम बंगालच्या हशिमारा एअरबेसवर तैनात असेल. एका स्क्वाड्रनमध्ये 18 विमाने असतात. फ्रान्समधून भारताने एकूण 36 राफेल लढाऊ विमानांवर स्वाक्षरी केली आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान 59000 कोटी रुपयांमध्ये 36 राफेल विमानांचा करार झालाय.