Ration Card Latest Update: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल (Ration Card) आणि सरकारच्या स्वस्त धान्याच्या दुकानांमधून तुम्हीही रेशन खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नव्या अपडेट अंतर्गत आसाममध्येही आता रेशन कार्ड 'पोर्टेबिलिटी' सर्विस (Ration Card Portability) सुरु करण्यात आली आहे.
'एक देश, एक रेशन कार्ड' (One Nation, One Ration Card) ही केंद्राची योजना इथंही लागू करण्यात आली आहे.
कोणत्याही रेशनच्या दुकानातून घेता येणार सामान
अन्नपुरवठा मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ओएनओआरसी (ONORC) अंतर्गत राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम, 2013 (NFSA) अन्वये लाभ घेऊ शकणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिवाईस (E-POS) असणाऱ्या रेशनच्या दुकानतून अनुदान असणाऱ्या धान्याची खरेदी करता येणार आहे.
सर्व राज्यांमध्ये लागू
सदर योजनेच्या वापरासाठी लाभार्थ्यांनी बायोमेट्रीक प्रमाणीकरण (Biometric Authentication) करुन घेणं आवश्यक असेल. केंद्राची ही योजना लागू करणारं आसाम हे 36 वं राज्य/ केंद्रशासित प्रदेश आहे. सध्या संपूर्ण देशभरात अन्नसुरक्षा 'पोर्टेबल' करण्यात आली आहे.