आगरतळा : त्रिपुरामध्ये ३ मार्चला निवडणुक निकाल आले आणि भाजपाचा झेंडा फडकला. पंतप्रधानांनी आगरतळा येथे नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात नवा संदेश दिलाय.
'सबका साथ सबका विकास' या आपल्या नाऱ्याची त्यांनी पुन्हा आठवण करुन दिली.
तामीळनाडूतल्या पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. तिकडे पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या जाधोपुरू विद्यापिठातील शामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याचाही विटंबना करण्यात आली. त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय.
याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
अशी कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्रिपुरात अभूतपूर्व विजयानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या मदतीनं हटवला होता. कार्यकर्त्यांच्या याकृत्याविरोधात देशभरात संतापाची लाट उठलीय. त्याचे पडसादही उमटू लागले आहेत.
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितले की, ज्यांनी आम्हाला मत दिलं त्यांचही सरकार आहे आणि ज्यांनी मत नाही दिल त्यांचही सरकार आहे.
राज्यात हिंसेला स्थान नाही. मंचावर बसलेल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्यासहित त्यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांना मोदींनी हा संदेश दिलाय.