नेहरू गांधी परिवाराबाहेरची व्यक्तिही होऊ शकते काँग्रेस अध्यक्ष: सोनिया गांधी

२००४मध्ये आपण डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. कारण, मला माहित होते की ते मझ्यापेक्षा प्रभावी ठरू शकतील, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 10, 2018, 03:12 PM IST
नेहरू गांधी परिवाराबाहेरची व्यक्तिही होऊ शकते काँग्रेस अध्यक्ष: सोनिया गांधी title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरची व्यक्तिही काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते, असे म्हटले आहे. २००४मध्ये आपण डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. कारण, मला माहित होते की ते मझ्यापेक्षा प्रभावी ठरू शकतील, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतही घराणेशाही

एका वृत्तवाहिनिच्या कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधी यांना काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सोनिया गांधी यांनी उत्तर दिले. सोनिया गांधी यांना काँग्रेसचे नेतृत्व केवळ नेहरू-गांधी कुटुंबियांकडेच राहिल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सोनिया म्हणाल्या, काँग्रेसमध्ये नेता निवडणे ही एक लोकशाही प्रक्रिया राहिली आहे. जर मुद्दा घराणेशाहीचाच असेल तर, अमेरिकेतही हा मुद्दा चर्चिला जातो. क्लिंटन , बुश कुटुंबांमध्येही याची उदाहणरे सापडतात असे सोनिया गांधी म्हणाल्या.

हा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारा

काँग्रेस जोडून ठेवालया नेहरू गांधी कुटुंब फायदेशीर ठरते असाही सवाल सोनियां यांना विचारण्यात आला. यावर हा मोठा कठीण प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस कार्यकर्त्यांनाच विचारायला हवे असे सोनिया गांधी म्हणाल्या.