Ola Uber Price Disparity Android iPhone: कॅब एग्रीगेटर प्लॅटफॉर्म Ola आणि Uber ने सरकारने पाठवलेल्या नोटिसला उत्तर दिलं आहे. Iphone आणि Android युजर्सना एकच राईडसाठी किंमतीत तफावत दिसत असल्याचे समोर आलं होतं. याबाबतच सरकारने नोटिस पाठवली होती. त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही राइडची किंमत युजर्सच्या फोनच्या आधारांवर ठरवत नाहीत.
कंपन्यांनी म्हटलं आहे की, यासंदर्भातील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने दिलेल्या रिपोर्टनंतर ओला आणि उबेरला नोटिस जारी केली होती. यात दोन्ही कंपन्यांच्या युजर्सना आयफोन आणि अँड्रोइड फोनमध्ये वेगवेगळ्या किंमती का दिसतात, याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
ओला कंपनीच्या प्रवक्तांनी म्हटलं आहे की, आमच्याकडे सर्व ग्राहकांसाठी एक प्रायसिंग स्ट्रक्चर आहे. आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारे युजर्सना राइडसाठी वेग-वेगळे पैसे दाखवत नाही. शुक्रवारी जारी केलेल्या त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, CCPAला माहिती देताना म्हटलं आहे की हा गैरसमज दूर करण्यासाठी CCPA सोबत काम करण्यासाठी तयार आहे.
ओलाबरोबरच उबेर कंपनीनेदेखील हे म्हटलं आहे. उबरच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही राइडच्या फोन मॅन्युफॅक्चरच्या आधारे किंमत ठरवत नाही. आम्ही ही समस्या सोडवण्यासाठी CCPA सोबत काम करण्यास तयार आहे. या प्रकरणी अॅपल आणि गुगलकडूनही अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
गेल्या काही महिन्यांपासून युजर्स हा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहेत. युजर्सचा आरोप आहे की, Ola आणि Uber एकाच राइडसाठी IOS आणि Andriod युजर्ससाठी वेगवेगळ्या किंमती दाखवतात. सोशल मीडियावर सातत्याने या सर्व्हिसेसविरोधात आवाज उठवत आहेत. त्यानंतर या कंपन्याना नोटिस पाठवण्यात आली आहे.