गॉगल लावून मतदानकेंद्रात येणाऱ्या 'या' महिला अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल; राजकारणाला ग्लॅमरची जोड

Lok Sabha Election 2024 Voting News : निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चा आणखी एका महिला निवडणूक अधिकाऱ्यांची. तुम्ही पाहिले का फोटो?   

सायली पाटील | Updated: Apr 19, 2024, 11:03 AM IST
गॉगल लावून मतदानकेंद्रात येणाऱ्या 'या' महिला अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल; राजकारणाला ग्लॅमरची जोड title=
loksabha Elections Voting 2024 Who is Saharanpur polling officer Isha Arora Said this on viral pictures in elections

Lok Sabha Election 2024 Voting News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात गेल्या कैक दिवसांपासून झालेली होती. ज्यानंतर आता देशात खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. देशात सध्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली असतानाच आता याच मतदान प्रक्रियेचे काही पैलू सर्वांसमोर येत आहेत, थोडक्यात राजकीय वर्तुळात ग्लॅमरची जोडही मिळताना दिसत आहे. विश्वास बसत नाहीये? मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यांचा फोटो पाहून यावर अनेकांचाच विश्वास बसत आहे. 

कोण आहेत या महिला अधिकारी? 

उत्तर प्रदेशातील सरहानपूर येथे निवडणुकीदरम्यान सोपवण्यात आलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून या महिला अधिकारी तेथील मतदान केंद्रावर रुजू झाल्या. ईशा अरोरा, असं त्यांचं नाव. सध्याच्या घडीला ईशा गंगोह विधानसभा क्षेत्रातील महंगी गावात निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी बजावताना दिसत आहेत. 

एक अधिकारी असण्यासोबतच एक महिला मतदार म्हणूनही ईशा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली असून, कुठंही कोणाचीही गैरसोय होत नसल्याचं वक्तव्य केलं. 

हेसुद्धा वाचा : मत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या 

कुठं नोकरी करतात या महिला अधिकारी? 

ईशा अरोरा भारतीय स्टेट बँकेत सेवेला असून, त्या गंगोह येथे प्रथम निवडणूक अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्या आहेत. ईशा अरोरा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनाच 2019 मधील पिवळ्या साडीतील महिला निवडणूक अधिकाऱ्यांची आठवण झाली. रीना द्विवेदी असं त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव. उत्तर प्रदेशातील PWD मध्ये क्लर्क पदावर काम करणाऱ्या रीना यांचीही निवडणुकीच्या धामधुमीच हवा होती हे खरं.