लडाख : भारताचं २० वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे. आता लडाख (Ladakh)वर्षभर भारताशी जोडलेला राहणार आहे. रोहतांग जवळ (Rohtang Pass) टनल सुरु होताच लडाखला पोहोचण्याची वेळ देखील वाचणार आहे. हा रस्ता मनाली- हिमाचलमधील दार्चा- शिंकुला येथून लडाखच्या झंस्कार वॅली (Zanskar Valley) तून पुढे जाईल.
या रस्त्यातून जात असताना येथे इतर भागाच्या तुलनेत बर्फवृष्टी कमी होते. हा रस्ता नदीच्या बरोबरीने पुढे जातो. त्यामुळे बर्फवर्षावच्या काळात ही लेह आणि कारगीलला जाता येऊ शकते. शिंगुला जवळ टनल बनवण्याचं काम सुरु आहे. ज्याला अजून ३ वर्ष लागतील. पण हे टनल बनण्याआधी लडाखसाठी तिसरा रस्ता देखील तयार होत आहे.
आतापर्यंत कारगील (Kargil) किंवा लेह (Leh) पोहोचण्यासाठी दोनच रस्ते होते. एक रस्ता श्रीनगर (Srinagar)वरुन तर दुसरा रस्ता मनाली- रोहतांग -लाचुंग ला- बारालाचला -तंगलांग असा लेहला जात होता. पण हे दोन्ही मार्ग वर्षात काही महिनेच उघडे असायचे. बर्फवृष्टीमुळे ते बंद राहायचे.
कारगील युद्धाच्या वेळी तीसरा मार्ग बनवण्याची योजना आखली गेली होती. ज्यामुळे वर्षभर लडाखला जाण्याचा मार्ग सुरु राहिल. जर शत्रूने एक मार्ग बंद केला तर लष्कराच्या जवानांना लडाखला पोहोचण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू देखील पोहोचवता येणार नाही.