Cyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल

Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.

Updated: Jan 4, 2023, 12:19 PM IST
Cyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल title=

Indian Railway Ticket Booking Scam: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माहिती कनेक्ट आणि शेअर करण्यासाठी एक प्रमुख स्थान बनले आहे. Facebook, Twitter आणि Instagram सारखे प्लॅटफॉर्म सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र हे अॅप वापरताना नेहमी जबाबदारीने वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच नागरिकांना नेहमी गोपनीय किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याची चेतावणी दिली जाते. कारण आपली एक लहान चूक आपल्याला महागात पडू शकते. कारण असाच एक प्रकार मुंबईतील महिलेसोबत घडून आला आहे. एका महिलेने तिच्या रेल्वे तिकीटाबाबतची तक्रार सोशल मीडियावर शेअर केली अन् सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून सुमारे 64,000 रुपये लंपास करण्यात आले. नेमकं काय घडलं त्या महिलेसोबत जाणून घेऊया...

 नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारी एम एन मीना (34) यांनी 14 जानेवारीला भुजला जाण्यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तीन तिकीटे बुक केली. पण ट्रेनमधील सर्व सीट्स बुक झाल्यामुळे त्यांना RAC सीट्स मिळाल्या. सीट कन्फर्म झाली आहे की नाही? या गोंधळामुळे मीना यांनी त्यांचा तिकिट तपशील आणि त्यांचा मोबाईल नंबर ट्विटरवर पोस्ट केला आणि IRCTC ला टॅग केले. त्यानंतर काही वेळात त्यांना फोन आला जो त्यांच्या मुलाने उचलला. त्यावेळी समोरच्याने स्वत:ची ओळख IRCTC चे कस्टमर सपोर्ट ऑफिसर अशी करून दिली त्यावेळी मीना यांना असे वाटले की, IRCTC ने मदतीसाठी कॉल केला असेल. म्हणून त्यांनी विचार न करता लिंकद्वारे 2 रूपये दिले. यानंतर काही वेळातच बॅक टू बॅक ट्रान्झॅक्शनचे अनेक मिळाले आणि फसवणूक करणाऱ्याने त्याच्या खात्यातून 64,000 रूपये काढून घेतले. 

मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं अन् 

"आयआरसीटीसीच्या ट्विटर पेजवर तक्रार ट्विट केल्यानंतर काही वेळाने कॉल आला म्हणून माझ्या मुलाने कॉलरवर विश्वास ठेवला. कॉलरने तो आयआरसीटीसीच्या कस्टमर केअरचा असल्याचा दावा केला आणि आमचे तिकीट कन्फर्म करण्याचे आश्वासन दिले. त्या व्यक्तीने नंतर तपशील भरण्यास सांगितले. मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले. बँकेचे तपशील आणि इतर माहिती भरून अपलोड करण्यात आली. नंतर आम्हाला माझ्या मोबाईलवर पाच व्यवहार अलर्ट आले." मीना यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "आम्ही तक्रार ट्विट केली होती, की आमच्या आरएसी जागा निश्चित झाल्या नाहीत तर आम्हाला बसून प्रवास करावा लागेल जे कठीण होईल," मीना यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

वाचा : सोने ‘इतक्या’ रुपयांनी महागले तर चांदी... ; जाणून घ्या नवीन दर 

ही एक प्रकारची फिशिंग लिंक होती ज्यावर फसवणूक करणाऱ्याने पैसे पाठवताच त्याच्या बँक खात्याचे तपशील चोरले आणि खात्यातून 64,000 रुपये काढून घेतले. लक्षात ठेवा, कोणतीही संस्था किंवा कंपनी तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील विचारत नाही किंवा व्यवहारांसाठी विनंती करत नाही.

फिशिंग म्हणजे काय?

फिशिंग ही डिजिटल गुन्ह्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये फसवणूक करणारे विश्वसनीय स्त्रोत असल्याचे भासवून लोकांना ई-मेल, संदेश किंवा लिंक पाठवतात आणि तुम्हाला विश्वासात घेऊन तुमची वैयक्तिक माहिती चोरतात.