मुंबई : कोरोनाचा विषाणू दिवसेंदिवस आणखी घातक होत चालला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये बुजशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसू लागली आहेत. या आजारामुळं अंधत्व येतं. या लक्षणांमुळे मृत्यूदेखील ओढावण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कॅन्सर आणि डायबिटिसच्या रुग्णांना बुरशीजन्य आजाराचा धोका 60 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये 30 दिवसानंतर या आजाराची लक्षणं दिसतात.
दुसरी गंभीर बाब म्हणजे कोरोनाच्या रुग्णांच्या शरिरात रक्ताच्या गाठी आढळून आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाच्या हातात रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाचे भारतातील रुग्ण कमी झाले आहेत. पण युरोप आणि अमेरिकेत कोरोना वाढत चालला आहे. कोरोनाच्या साईड इफेक्टची यादी वाढतच चाललीय. वर्षभरात कोरोना आणखी घातक होत चाललाय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातमी: कोरोनाच्या नव्या विषाणुचा युरोपात थैमान, अनेक देशात लॉकडाऊन