अपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या

IAS Officer Saumya Sharma :   देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परिक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा (CSE). या परीक्षेत 2017 ला आयएएस सौम्या शर्मा (Saumya Sharma) यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. 

Updated: Aug 9, 2022, 01:45 PM IST
अपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या  title=

IAS Success Story :  देशाच्या ब्यूरोक्रसी काम करण्यांच स्वप्न उराशी बाळगून लाखों विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षेची (CSE) तयारी करत असतात. देशभरातील लाखोंच्या संख्येने तयारी करत असलेल्या उमेद्वारांतून (UPSC Aspirants) अगदी काहींचं स्वप्न पुर्ण होतं. 2017 ला यश मिळवणाऱ्या आयएएस अधिकारी सौम्या शर्मा (IAS Officer Saumya Sharma) यांचा संघर्षमय प्रवास हा अतंत्य प्रेरणादायी आहे. ऐकण्याची क्षमता नसतानाही त्यांनी प्रचंड मेहनत करुन UPSC परीक्षेत यश मिळवलं.

कोण आहेत आएएस सौम्या शर्मा? 

वयाच्या 16 व्या वर्षी 90 ते 95 टक्के ऐकण्याची क्षमता गमावली. असं असलं तरी, या समस्येला डावलून सौम्या शर्मा यांनी प्रचंड मेहनत करुन 2017 ला युपीएससीच्या परीक्षेत केवळ यश मिळवलं नाही तर देशातून 9 वा क्रमांक मिळवला. त्यांचा हा संघर्षमय प्रवास यूपीएससीच्या परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरेल. 

आयएएस सौम्या शर्माची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. यूपीएससीच्या सर्व पेपर्समध्ये त्यांनी चांगले मार्कस मिळवले होते. त्यांनी केवळ चार महिन्यांच्या तयारीत यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं. 2017ला सौम्या शर्माने देशातून 9 व्या क्रमांक मिळवण्याचा मान मिळाला.

दिवसाला 16 तास अभ्यास केला

सौम्या शर्मा कर्णबधिर असल्याने सौम्या शर्माचा समावेश दिव्यांग व्यक्तींच्या श्रेणीमध्ये केला होता. पण त्यांनी याला नकार देत, सामान्य श्रेणीची यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा फॉर्म भरताना निवड केली. सौम्या शर्माने दहावीच्या परीक्षेतसुद्धा टॉप केलं होतं. सौम्या यांना सुरुवाती पासूनच चालू घडामोडींमध्ये आवड होती. त्या वयाच्या तिसऱ्या वर्षांच्या असताना पासून वर्तमानपत्राचं वाचन सुरु केलं होतं. यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांनी दिवसाला साधारण 16 तास अभ्यास केला होता. त्यांच्या या मेहनतीमुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात देशातून 9 वा क्रमांक मिळवत यश प्राप्त केलं.