मुंबई : नवरा बायकोमध्ये नेहमी मैत्रीचं नातं असावं, त्यामुळे नवरा-बायकोंनी कोणतीही गोष्ट आपल्या जोडीदारापासून लपवू नये असं ही म्हणतात. या दोघांमध्ये या ना त्या कारणामुळे भांडणं होतात खरी परंतु ती तेवढ्या पूर्तीच असतात. ही भांडणं विसरुन त्यांनी आयुष्यात नेहमी पुढे जावं असं म्हणतात. परंतु त्यांच्यामधील हीच भांडणं एखाद्याच्या जीवीवर उठली तर? अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहराला धक्का बसला आहे.
खरंतर इथे एका नवऱ्यानं आपल्या बायकोचा एक हातच कापला आहे. जे खरोखरंच खूप धक्कादायक आहे. या नवऱ्याचा हा घात इतका भीषण होता की, त्याने मनगटापासून पूर्णपणे आपल्या बायकोचा हात वेगळा केला.
ही घटना पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम येथील आहे. पीडित महिला रेणू खातून ही सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते.
खरंतर बायकोला जेव्हा नोकरी मिळाली, तेव्हा तिचा नवरा मोहम्मद शेख याला भीती वाटू लागली की, पत्नीने नोकरी सुरू केली तर ती आपल्यापासून दूर जाईल आणि आपल्याला सोडून जाईल. त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषाशी देखील लग्न करेल.
रेणू खातून रोज नोकरीला जाऊ लागल्यावर पती मोहम्मद शेखचा संशय वाढत गेला. त्यात त्याच्या मित्रांनी त्याला चिथावणी देण्याचे काम केले, कारण ते नेहमी शेखला सांगत होते की एके दिवशी त्याची पत्नी त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न करेल.
रेणू खातून यांनी सांगितले की, जेव्हा माझे नाव सरकारी नोकरीत आले तेव्हा तिने नवऱ्याला याबद्दल सांगितले, परंतु तिच्या नवऱ्याने तिला ही नोकरी करु देणार नाही असं सांगितलं. तिने नवऱ्याला अनेक वेळा समजावले, परंतु त्यांच्यात भांडणं होऊ लागली.
रेणूने सांगितले की, एक दिवल रात्रीचे जेवण करून 10 वाजता मी झोपले होते, तेव्हा रात्री माझे दोनदा डोळे उघडले, तेव्हा माझा नवरा पुन्हा पुन्हा वॉशरूमला जात असल्याचे दिसले. असे विचारले असता त्याने सांगितले की, त्याच्या पोटात दुखत आहे.
रेणूने सांगितले की, काही वेळातच मला समजले की, कोणीतरी माझ्या तोंडावर उशी ठेवली आहे आणि कोणीतरी माझा हात धरला आहे. यानंतर माझा हात त्याने कात्रीने कापला.
तिने सांगितले की, ''तेथे एकूण 3 लोक होते. ज्यालोकांनी मला धरुन ठेवलं होतं. बाकीचे लोक तिथून निघून गेल्यावर त्यांनी माझ्या तोंडावर उशी ठेवली. निघताना माझी सर्व कागदपत्रेही घेतली. यानंतर मला बर्दवान मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, तिथे प्राथमिक उपचारानंतर मला दुर्गापूर येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले, कारण जखमा खूप खोल होत्या.''
डॉक्टर परमहंस यांनी सांगितले की, रुग्णाचा उजवा हात पूर्णपणे कापला गेला आहे. प्रकृती चिंताजनक असून कपाळावरही बरीच जखम होती. तिचा जीव वाचवण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. परंतु तिचा हात कापावा लागला, कारण त्याला पुन्हा जोडण्याची शक्यता नव्हती.
सध्या पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.