IPS अधिकारी असूनही तिनं पुन्हा दिली UPSC परीक्षा, पण रिझल्ट समोर आला तेव्हा...

दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. 

Updated: Jun 7, 2022, 11:09 AM IST
IPS अधिकारी असूनही तिनं पुन्हा दिली UPSC परीक्षा, पण रिझल्ट समोर आला तेव्हा... title=

मुंबई : गेल्या आठवड्यात UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर  या परीक्षेत रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा सर्वत्र येऊ लागल्या. खरंतर लोकांना देखील अशा गोष्टी ऐकायला फार आवडतात, यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. अशीच एक कथा आहे, बिहारमधील UPSC उमेदवार दिव्या शक्तीची, जिने एकदा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि उतीर्ण देखील झाली. (UPSC Civil Services Exam Results 2022)

दिव्या शक्ती आहे तरी कोण?  (Who is Divya Shakti)

दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. ती नेहमीच गुणवान विद्यार्थिनी होती, तिने मुझफ्फरपूरमधून हायस्कूल पूर्ण केले आणि तिच्या इंटरमिजिएट अभ्यासासाठी डीपीएस बोकारो येथे गेले. (UPSC Civil Services)

तेथे तिने BITS पिलानी येथून संगणक शास्त्रात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. दिव्याने त्याच कॉलेजमधून अर्थशास्त्रात एमएस्सीही केले आहे. त्यानंतर तिने एका अमेरिकन कंपनीत देखील दोन वर्षे काम केले आणि 2019 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली.

दिव्याने तिच्या पहिल्या प्रयत्नात 79 वा क्रमांक मिळवला आणि 2019 मध्ये तिची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. मात्र, तिची स्वप्नं मोठी होती आणि तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते.

म्हणून मग तिने आपल्या या परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा UPSC 2022 च्या परीक्षेला बसली. दिव्या शक्तीने तिच्या IPS मध्ये प्रशिक्षण घेत परीक्षेची तयारी केली आणि तिने या वर्षी अखिल भारतीय स्तरावर 58 वी रँक मिळवले. ज्यानंतर तिला खूप आनंद झाला.

दिव्याचे वडील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (GMCH), बेतियाचे माजी अधीक्षक आहेत. ते म्हणाले की, ''दिव्या ही सुरुवातीपासून अभ्यासू होती. ज्यामुळे तिच्या जिद्दीने तिने हे सगळं केलं आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे. ती अनेकांसाठी प्रेरणा आहे.''