Mami Got Married With Bhanji: बिहारच्या गोपालगंज येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. भाचीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या मामीने पहिले तिच्या पतीला सोडलं. इतकंच नव्हे तर भाचीला पळवून नेत तिच्याशी लग्न केले. दोघांच्या लग्नानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयाना ही माहिती मिळाली आहे. दोघींमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अफेअर सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे.
बेलवा येथे राहणाऱ्या या मामी आणि भाची या दोघींनी दुर्गा मातेच्या मंदिरात लग्न केले आहे. मंदिरातच लग्नाच्या विधी करण्यात आल्या आहेत. तिथेच एकमेकींच्या गळ्यात वरमाला घालून त्यांनी लग्न केलं आहे. त्यांचे लग्न हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. शोभा आणि सुमन असं यादोघींचे नाव आहे.
भाची शोभा हिच्या प्रेमात मामी सुमन पडली होती. सुममने म्हटलं आहे की, मला भीती होती की तिचे लग्न दुसरीकडे कुठेतरी होईल. ती खूप सुंदर आहे. याच भीतीपोटी आम्ही सर्वकाही सोडून मंदिरात लग्न केले. तर, शोभाने म्हटलं आहे की, सासामुसा मंदिरात आम्ही लग्न केले आहे. लग्नानंतर आम्ही कायम एकत्र राहू अशी शपथ घेतली आहे.
दोघींचे लग्न ठरतंय चर्चेचा विषय
गोपालगंजमध्ये मामी आणि भाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत दोघांनी कुटुंबीयांना या लग्नाची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दोघंही बोलताना दिसत आहेत की, त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे आणि सातजन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलं आहे. मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअर