Forbes India Rich List 2021: हे भारतातील टॉप 10 श्रीमंत; पहिल्या स्थानी...

भारतातल्या पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये कोणाचा समावेश? वाचा...  

Updated: Oct 8, 2021, 10:58 AM IST
Forbes India Rich List 2021: हे भारतातील टॉप 10 श्रीमंत; पहिल्या स्थानी... title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्स या जगभरातील श्रीमंतांविषयी माहिती देणाऱ्या  मॅगझीन फोर्ब्स (Forbes)नुसार, मुकेश अंबानी हे 2021 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी 2008 पासून सलग 14 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत अव्वल आहेत. श्रीमंतांच्या या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आणि शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 

यानुसार, मुकेश अंबानींची संपत्ती सुमारे 93 बिलियन म्हणजे जवळपास 6.96 लाख कोटी रुपये आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेले गौतम अदानी यांच्याकडे 74.8 बिलियन डॉलर म्हणजेच 5.61 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. फोर्ब्सनुसार, कोरोना महामारीच्या दुसऱ्या वर्षी भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, ही यादी भारतातील कुटुंब, शेअर बाजार, विश्लेषक आणि भारतच्या रेग्युलेटर एजन्सींकडून मिळालेल्या शेअरहोल्डिंग आणि आर्थिक माहितीच्या आधारे तयार केली गेली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर भारताने जगातील सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे.

नवीन उच्चांक गाठत सेन्सेक्स वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी वाढला आहे. यानंतर देशातील 100 श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले. फोर्ब्सच्या मते, देशातील 100 श्रीमंत लोकांनी गेल्या 12 महिन्यांत 50% वाढीसह  257 बिलियन डॉलर कमावले आहेत.