चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का

Shocking News :चंदौलीतील एका घरात तरूणी चहा (Tea) बनवत होती. ही चहा बनवत असताना तिच्या घरातील लाईट अचानक गेली होती. यामुळे तिला त्या काळ्याकुंट अंधारात चहा बनवावा लागला होता. हा चहा बनवताना चुकुन तिने चहामध्ये चहापत्ती टाकण्याऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकली होती. 

Updated: Jan 4, 2023, 10:20 PM IST
चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का  title=

Shocking News : घरात चहा (Tea) बनवतेवेळी अचानक लाईट गेली आणि चुकून चहापत्तीऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ज्यावेळेस ही चहा बनली आणि घरातील लोकांनी ती  प्यायली. त्याच्यानंतर घरातील लोकांची प्रकृती गंभीर झाली होती. ही घटना पाहून घरातल्या लोकांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्याची वेळ आली होती. सध्या रूग्णांची तबियत स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेने कुटूबियांना मोठा धक्का बसला आहे.  

नेमकी घटना काय?

चंदौलीतील एका घरात तरूणी चहा (Tea) बनवत होती. ही चहा बनवत असताना तिच्या घरातील लाईट अचानक गेली होती. यामुळे तिला त्या काळ्याकुंट अंधारात चहा बनवावा लागला होता. हा चहा बनवताना चुकुन तिने चहामध्ये चहापत्ती टाकण्याऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकली होती. ही चहा तयार झाली आणि तिने घरातल्यांना प्यायला दिली. ही चहा प्यायल्यानंतर तिघांचीही प्रकृती अचानक बिघडू लागली होती.या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

असा गोंधळ झाला...

राजधानी कुमार नावाच्या व्यक्तीचे कुटुंब चांदौली येथील कांशीराम आवास योजनेत राहते. राजधानी कुमार यांची मुलगी मंगळवारी संध्याकाळी सात वाजता चहा (Tea)बनवत होती. स्टोव्हवर दूध आणि पाणी उकळत होते, त्याचवेळी वीज गेली असे सांगण्यात येत आहे. यानंतर किचनमध्ये चहाच्या पानांजवळ उंदीर मारण्याच्या (rat killer)औषधाची गोणीही ठेवण्यात आली होती. यावेळी मुलीने चहाची पाने समजून उकळत्या दुधात आणि पाण्यात उंदराचे विष टाकले आणि एकच गोंधळ झाला. 

रुग्णालयात दाखल 

चहा (Tea) बनल्यानंतर राजधानी कुमार आणि त्यांच्या दोन मुलांनी चहा प्यायला होता. हा चहा प्यायल्यानंतर काही वेळातच तिघांचीही प्रकृती ढासळू लागली. तिघांचीही प्रकृती बिघडलेली पाहून शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाच्या पानांऐवजी चहामध्ये उंदराचे (rat killer)विष मिसळून चहा बनवल्याचे आढळून आले, जे प्याल्यानंतर तिघांचीही प्रकृती बिघडली होती. 

रात्री 9 वाजता वडील आणि 2 मुलांसह 3 लोक रुग्णालयात आले होते. त्यांनी उंदीर मारणारा (rat killer)चहा प्यायला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. इथे आल्यावर त्याची प्रकृती चांगली नव्हती, पण मी त्याच्यावर उपचार करत आहे, ते पूर्वीपेक्षा बरे आहेत, असे चंदौलीचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. चंदौलीमध्ये राहणाऱ्या राजधानी कुमार यांच्या घरात ही घटना घडली आहे. ही घटना वाचून अनेकांना धक्का बसला आहे.