रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : देशभर कोरोना केसेस (Corona in India) पुन्हा वाढत असल्याचं समोर आले आहे. या पार्श्वभुमीवर देशात ९ राज्यांत शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुतांश राज्यात ८ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीत एकाच दिवशी ५३% केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गुजरातेत ८ महापालिका क्षेत्रात शाळा बंद आहेत.
दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना आणि पुडुचेरी यासारख्या राज्यांत सरकारने पुन्हा शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. दिल्लीत गुरूवारी एकाच दिवशी २ हजार ७९० केसेस आढळल्या आहेत.
बुधवारच्या तुलनेत ५३ टक्के केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक शुक्रवारी बोलाविली आहे. तर इतर राज्यांतही सरकारतर्फे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वास्तविक बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फेब्रुवारी महिन्यात शैक्षणिक संस्था सुरू होऊ लागल्या, परंतु वाढत्या केसेसमुळे आता पुन्हा बंद कराव्या लागत आहेत. तर बर्याच राज्यात शाळा आणि बोर्ड वर्गांसाठीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.
कोणत्या राज्यात शाळा बंद ?
दिल्ली : आठवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अभ्यासक्रम ऑनलाईन घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्यायत. ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वी मधील विद्यार्थीच शाळेत मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ शकतील. पालकांच्या परवानगीने हे विद्यार्थी परीक्षा, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट कामासाठी शाळेत येऊ शकतील असेही सांगण्यात आलंय.
हिमाचल प्रदेश : १५ एप्रिल पर्यंत सर्व शाळा, काॅलेज, इतर शैक्षणिकक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय.
मध्य प्रदेश: आठवी पर्यंत चे सर्व शाळा १५ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
उत्तर प्रदेश:* ४ एप्रिल पर्यंत आठवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ५ एप्रिल पासून खाजगी शाळा सुरू होण्याच्या तयारी करत आहेत.
पंजाब : १० एप्रिल पर्यंत सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. कोरोनाच्या दुसरी लाटेत पंजाबचा सहावा नंबर लागतोय.
गुजरात : आठ महापालिका क्षेत्रात शाळा बंद केल्या आहेत. अहमदाबाद, सुरत, वडोदरा, जामनगर, जुनागड, भावनगर, गांधीनगर, राजकोट मध्ये शाळा बंद. तर ९ वी ११ पर्यंत मर्यादीत संख्या सह शाळा सुरू आहेत.
कर्नाटक : पहिली ते ९ पर्यंत सर्व शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.